ETV Bharat / city

Sujata Patil Video : 'मुख्यमंत्री साहेब, आता तुम्हीच मला मृत्युची शिक्षा द्या'; सुजाता पाटील यांची न्यायाची मागणी - निलंबित पोलीस अधिकारी सुजाता पाटील

सुजाता पाटील यांनी मागील अडीच महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, गृहविभाग आणि पोलीस महासंचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला. माझ्यावर अन्याय झाला असून मला खोट्या प्रकरणात अडकवून माझे करियर संपवण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते करत असल्याची तक्रार त्यात करण्यात आली.

Sujata Patil
सुजाता पाटील
author img

By

Published : Dec 25, 2021, 2:45 PM IST

मुंबई - लाचखोरी प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील ( Assistant Commissioner of Police Sujata Patil Video ) यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुजाता पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना 'मला मृत्यू द्या' अशी विनंती ( Sujata Patil Appeal to Chief Minister ) केली आहे. तसेच लाचखोरी प्रकरणात कसे फसवण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास दिला जात असल्याचे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

'मुख्यमंत्री साहेब, आता तुम्हीच मला मृत्युची शिक्षा द्या'

पत्रव्यवहाराची कुठलीही दखल नाही -

सुजाता पाटील यांनी मागील अडीच महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, गृहविभाग आणि पोलीस महासंचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला. माझ्यावर अन्याय झाला असून मला खोट्या प्रकरणात अडकवून माझे करियर संपवण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते करत असल्याची तक्रार त्यात करण्यात आली. मात्र, अडीच महिने उलटूनही पाटील यांच्या पत्रव्यवहाराची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर सुजाता पाटील यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे.

लाच घेतल्याप्रकरणी निलंबन -

व्हिडिओमध्ये सुजाता पाटील यांनी त्यांना कसे फसवण्यात आले, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कसे छळण्यात आले, याबाबतचे वक्तव्य केले आहे. कोर्ट-कचेऱ्या करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. त्यापेक्षा मला मृत्यू द्या, असे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सहपोलीस आयुक्त, पोलिस महासंचालक यांना उद्देशून म्हटले आहे. मेघवाडी विभागाच्या तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त असणाऱ्या सुजाता पाटील यांना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी ४० हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर सुजाता पाटील यांना निलंबित करण्यात आले असून सध्या त्या जामिनावर आहेत. निलंबनाच्या कालावधीत त्यांना नायगाव सशस्त्र विभागात पाठवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.