ETV Bharat / city

शिक्षकाने चापट मारल्याने विद्यार्थ्याचा कानाचा पडदा फाटला; गुन्हा दाखल - शिक्षकावर गुन्हा दाखल

सांताक्रूझ पोलिसांनी शिक्षक कमलेश तिवारी (50) यांच्यावर आयपीसी कलम 325 (गंभीर दुखापत) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यातील कलम 75 अन्वये एका मुलावर क्रूर कृत्य केल्याबद्दल गुन्हा ( police filed case against Sanskrit teacher ) दाखल केला. 30 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल आला. या शिक्षकाला अद्याप अटक झालेली नाही.

मुंबई पोलीस
मुंबई पोलीस
author img

By

Published : Oct 3, 2022, 9:45 AM IST

मुंबई - सांताक्रुज येथील एका शाळेत संस्कृतच लेक्चर सुरू असताना एक विद्यार्थी मागे बोलत असल्याचे समजून संस्कृत शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कानाखाली लगावली. यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या कानाचा पडदा फाटल्याची घटना आता समोर ( Teacher slap Mulund case ) आली आहे. शिक्षकावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सांताक्रुज पोलीस ( injury of students ear in Mulund ) करत आहेत.

गुन्हा दाखल पण अद्याप अटक नाही सांताक्रूझ पोलिसांनी शिक्षक कमलेश तिवारी (50) यांच्यावर आयपीसी कलम 325 (गंभीर दुखापत) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यातील कलम 75 अन्वये एका मुलावर क्रूर कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. 30 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल आला. या शिक्षकाला अद्याप अटक झालेली नाही.

आईने केली पोलिसात तक्रार 27 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. संस्कृतचे वर्ग घेत असलेल्या तिवारी यांना पीडित विद्यार्थी शिकवणीत लक्ष देत नसल्याचा संशय आला. या संशयातूनच कमलेश तिवारी या संस्कृत शिक्षकाने सदर विद्यार्थ्यांच्या कानाखाली वाजवली. यानंतर या विद्यार्थ्यांचा कान दुखू लागल्याने त्याला त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांच्या अहवालात विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला छिद्र झाल्याचे निदर्शनास आले. त्याची आई पूनम यांनी सांताक्रुज पोलिसात तक्रार दाखल केली होती.

काय म्हटलंय तक्रारीत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संस्कृतचा तास सुरू असताना तिवारी हे शिक्षक वर्गात शिकवत होते. याच दरम्यान काही विद्यार्थी वर्गात बोलत होते. अशात पीडित विद्यार्थी तोंडावर हात ठेवून वर्गात लेक्चरला बसला होता. तोच बोलत असल्याचा संशय या संस्कृत शिक्षकाला आला. त्यामुळे संतापलेल्या या शिक्षकाने विद्यार्थ्याच्याकानशिलात लगावली. यातच त्याच्या कानाचा पडदा फाटला.

ऐकू येत नव्हते या घटनेनंतर, वेदना होत असल्याची विद्यार्थ्याने तक्रार केली. नीट ऐकू येत नसल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन महिला शिक्षिकांना विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या आईला घटनेची माहिती दिली आणि ईएनटी तज्ञाचा सल्ला घेण्यास सांगितले. तपासणीत त्याच्या कानाचा पडदा फुटल्याचे दिसून आले, अशी माहिती सांताक्रुज पोलिसांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.