मुंबई - 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी ( Legislative Council elections ) शिवसेनेचे सर्व आमदार ( Shiv Sena MLA ) मुंबईत 17 जूनला दाखल झाले आहेत. दहा जागांसाठी ( Election for ten seats ) अकरा उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचे नियोजन पवईतील वेस्टीन हॉटेल येथे करण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे ( Rajya Sabha elections ) विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला ( Shiv Sena MLA ) कोणताही फटका बसू नये याची काळजी पक्षाकडून घेतली जात आहे. मतदान करणाऱ्या आमदारांची जबाबदारी आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) हे स्वतः घेणार आहे. निवडणुकीपर्यंत त्यांचे सर्व नियोजन ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
निवडणुकीबाबत औपचारिक चर्चा - काल वेस्टन हॉटेलमध्ये सर्व शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले. काल मध्यरात्री राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलमध्ये सर्व आमदारांशी त्यांनी निवडणुकीबाबत औपचारिक चर्चा केली. त्यानंतर हॉटेलमध्येच शिवसेना नेत्यांसोबत एक बैठक ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली. या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे उपस्थित होते. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुक नियोजनाची चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्व आमदारांची बैठक - शिवसेनेचे सर्व आमदारांना 17 जूनला मुंबईत दाखल होण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी दिले होते. त्यानुसार शिवसेनेचे सर्व आमदार 17 जूनला मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह सर्व आमदारांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या चुका शिवसेनेकडून झाल्या त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये होवू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सर्व आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच कोणत्या आमदारांना इतर पक्षाकडून मतदानाबाबत संपर्क करण्यात आला का? याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली.