ETV Bharat / city

Phone Tapping Case : रश्मी शुक्ला कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दाखल, जबाब नोंदवणार

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आज बुधवार (दि. 16 मार्च)रोजी रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात येणार आहे. (Phone Tapping Case ) त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये त्या जबाब नोंदवणार आहेत.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला
author img

By

Published : Mar 16, 2022, 10:46 AM IST

Updated : Mar 16, 2022, 12:23 PM IST

मुंबई - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आज बुधवार (दि. 16 मार्च)रोजी रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात येणार आहे. (Phone Tapping Case ) त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये त्या जबाब नोंदवणार आहेत. यापूर्वीही पुणे येथे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

  • Mumbai, Maharashtra | IPS officer Rashmi Shukla reaches Colaba Police Station for recording statement in phone tapping case. She has protection from arrest from Bombay High Court. pic.twitter.com/pbTaQA3OYq

    — ANI (@ANI) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज रश्मी शुक्ला कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये येणार

कुलाबा येथील गुन्हा संदर्भात अटकपूर्व जामिनासाठी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अंतरिम दिलासा दिला होता. तसेच, न्यायालयाने सूचना देखील केल्या होत्या की पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्याच वेळी न्यायालयाने तपासाला जाणाऱ्या तारखा देखील घोषीत केल्या होत्या. त्यानुसार आज रश्मी शुक्ला कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये येणार असून त्या ठिकाणी चौकशी होणार आहे.

नाना पटोले यांचा फोन टॅप

राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते

अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून (2019)मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु, असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

राजकीय नेत्यांचे फोन टॅप करणं वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केला त्यात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विरोधात रेशमी शुक्ला यांनी FIR रद्द करण्यात यावा याकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा दिला आहे. कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्या आहे.

हेही वाचा - Ukraine-Russia war : युक्रेन- रशिया युध्दाचा 21 वा दिवस! युक्रेनवर चर्चा करण्यासाठी बायडेन युरोपला जाणार

Last Updated : Mar 16, 2022, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.