ETV Bharat / city

ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून फायझर अस्ट्रॅाझेनेकाची माघार - फायझर अस्ट्रॅझेनेकाची माघार

युरोपातील रोमानिया देशातील ओटू ब्ल्यू एनर्जी एसआरएल या कंपनीने फायझर कंपनीची ॲस्ट्राझेनेका लस पुरविण्याची तयारी दाखवली हाेती. मात्र या पुरवठादाराने आज आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती पालिकेला ईमेलच्या माध्यमातून दिली आहे.

फायझर अस्ट्रॅाझेनेका
फायझर अस्ट्रॅाझेनेका
author img

By

Published : May 28, 2021, 8:04 AM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेने 1 कोटी लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 8 पुरवठादारांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र या प्रक्रियेतून कोणतेही कारण न देता फायझर अस्ट्रॅाझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे, यामुळे इतर 7 पुरवठादारांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती पालिकेचे विशेष उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. सध्या मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखता यावा म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू असताना लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पालिकेने एक कोटी लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

फायझर ॲस्ट्राझेनेकाची माघार -

फायझर अस्ट्रॅाझेनेका
फायझर अस्ट्रॅाझेनेका
महापालिकेने मागवलेल्या स्वारस्य प्रस्तावाला एकूण 8 पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यात सात पुरवठादारांनी स्पुटनिकची लस पुरवठा करण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. तर युरोपातील रोमानिया देशातील ओटू ब्ल्यू एनर्जी एसआरएल या कंपनीने फायझर कंपनीची ॲस्ट्राझेनेका लस पुरविण्याची तयारी दाखवली हाेती. मात्र या पुरवठादाराने आज आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती पालिकेला ईमेलच्या माध्यमातून दिली आहे. यामुळे आता पालिकेच्या ग्लोबल टेंडरसाठी स्वारस्य दाखवणारे रशियाच्या स्फुटनिक लसीचा पुरवठा करणारे 7 पुरवठादार आहेत, त्यांच्यापैकी पाच कंपन्यांशी पालिका अतिरीक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे.कागदपत्रे नाहीत पालिकेच्या ग्लोबल टेंडरमध्ये भाग घेण्याचे स्वारस्य दाखवणारे 7 पुरवठादार आहेत. ते स्वता लस बनवत नाहीत, त्यासाठी त्यांना लस बनवणाऱ्या कंपनीकडून लसीचा पुरवठा करू शकतात अशी खात्री पटणारी कागदपत्रे सादर करण्यास वेळ देण्यात आली आहे. येत्या 1 जूनपूर्वी या पुरवठादारांना अशी कागदपत्रे सादर करण्यास वेळ देण्यात आली आहे. अशी कागदपत्रे दिल्याने व त्याची तपासणी केल्याने संबंधित पुरवठादार आपल्याला लस पुरवठा करू शकतात याची खात्री पटल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती कबरे यांनी दिली.

हेही वाचा-आतापर्यंत 30 लाख 90 हजार 130 मुंबईकरांचे लसीकरण, काल 41 हजार 130 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.