मुंबई - उन्हाचे चटके जसे वाढू लागले आहेत. तसेच, आता महागाईचाही भाडका सुरू आहे. पाच रांज्यांच्या निवडणुका होऊन निकाल लागले आणि पेट्रोल, डिझेलच्या दराने उसळी घेतली आहे. आज बुधवार (दि. 23 मार्च)रोजी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलसह डिझेलच्या भावात 80 पैशांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे सामान्यांपासून नोकरदार वर्गापर्यंत सर्वच अडचणीत आले आहेत.
-
Petrol, diesel prices rise by 80 paise per litre for 2nd day in row
— ANI Digital (@ani_digital) March 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/hZy2UYQRQt#fuelpricehike #PetrolDieselPrice pic.twitter.com/4mR8WB44It
">Petrol, diesel prices rise by 80 paise per litre for 2nd day in row
— ANI Digital (@ani_digital) March 23, 2022
Read @ANI Story | https://t.co/hZy2UYQRQt#fuelpricehike #PetrolDieselPrice pic.twitter.com/4mR8WB44ItPetrol, diesel prices rise by 80 paise per litre for 2nd day in row
— ANI Digital (@ani_digital) March 23, 2022
Read @ANI Story | https://t.co/hZy2UYQRQt#fuelpricehike #PetrolDieselPrice pic.twitter.com/4mR8WB44It
22 मार्चला झालेली वाढ - पेट्रोल लिटरमागे ७५ पैशांनी महागले आहे. आजपासून पुण्यातील पेट्रोलचा दर प्रति लिटर ११०.३५ रुपये असणार आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. (Rise Diesel prices In Pune) आता पॉवर पेट्रोलचा दर ११४.८५ रुपये लिटर झाला आहे. पेट्रोलबरोबरच डिझेलच्या दरात प्रति लिटर ७४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा दर आता ९३.१४ रुपये लिटर झाला आहे. सीएनजीच्या दरात आजतरी वाढ करण्यात आलेली नाही. सीएनजीचा दर ६६ रुपये किलो इतका आहे.
एलपीजी ५० रुपयांनी महागला- १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. या वाढीनंतर नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. रोजच्या दैनंदिन गोष्टींना जास्त खर्च करावा लागत असल्याचही बोलल जात आहे.
डिझेलच्या दरात मोठी वाढ- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. 137 दिवसांच्या विश्रांतीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली होती. ती आज म्हणजेच बुधवारीही कायम होती. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी मोठी वाढ करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग आणखी काही दिवस वाढू शकतात.
दोन दिवसांत 1 रुपया 60 पैशांची दरवाढ- दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1.60 रुपयांनी वाढ झाली आहे. जेव्हा पेट्रोल आणि डिझेलची किंमत शेवटची बदलली गेली तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 82 च्या आसपास होती, जी सध्या $ 116 च्या आसपास आहे. त्यानुसार बघितले तर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर 14.40 रुपयांनी वाढू शकतात. त्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे या किमती आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी ? - पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड ९२२४९९२२४९ आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३१११२२२२ क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL चे ग्राहक HPPprice लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा - पुण्यात पेट्रोल डिझेलमध्ये 4 महिन्यानंतर वाढ; गॅसच्या किमतीचाही झाला भडका