ETV Bharat / city

Jumbo Covid Centre : जम्बो कोविड सेंटरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची न्यायालयात याचिका; न्यायालयाने दिले निर्देश... - कोरोना लेटेस्ट न्यूज

कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतरही त्याच व्यक्तीला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत असल्याचा एसएमएस बीकेसीतील जंम्बो कोविड सेंटरकडून ( Petition against Jumbo Covid Center ) पाठविण्यात आला. प्रशासनाच्या याच निष्काळजीपणामुळे आपल्या व्यक्तींचा जीव गेल्याचा आरोप करत मृत व्यक्तींच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

Breaking News
author img

By

Published : Aug 2, 2022, 10:46 PM IST

मुंबई - कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतरही त्याच व्यक्तीला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत असल्याचा एसएमएस बीकेसीतील जंम्बो कोविड सेंटरकडून ( Petition against Jumbo Covid Center ) पाठविण्यात आला. प्रशासनाच्या याच निष्काळजीपणामुळे आपल्या व्यक्तींचा जीव गेल्याचा आरोप करत मृत व्यक्तींच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मात्र खंडपीठाने त्यांची याचिका ऐकण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले आहे.

विधी शाखेत शिक्षण घेतलेल्या तसेच एम. आरची नोकरी करणाऱ्या सुनीलकुमार यादव यांना कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांना 2 मे 2021 रोजी बिकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना 15 मे रोजी त्यांना घाटकोपरच्या राजाबाई रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र 16 मे रोजी सुनीलकुमार यांचे निधन झाले. मृत्यूबाबत सकाळी त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली, नातेवाईकांनी मृतदेहावर त्याच दिवशी अग्निसंस्कार केले.

पश्चात कुटुंबियांवर आर्थिक संकट - दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी यादव यांना बिकेसी येथून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत असल्याचा एसएमएस नातेवाईकांना प्राप्त झाला. मुलाला दुसऱ्या रुग्णालयात हलविल्याने व रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला. बिकेसी जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठता डॉ. राजेश डेरे आणि अन्य संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत सुनीलकुमार यांचे वडील रामाशंकर यांनी अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यादव हे घरातील एकमेव कमावते असल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना भरपाईची देण्यात यावी अशी मागणीही याचिकेतून केली आहे. या याचिकेवर न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. किशोर संत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली मात्र खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार देत अन्य खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा - Attack on Uday Samant Vehicle : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा कात्रज चौकात हल्ला, गाडीची तोडफोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.