मुंबई - अदर पुनावाला यांना मिळालेल्या कथित धमकीची चौकशी करा, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे निर्देश द्या, तसेच पुनावाला यांना 'झेड प्लस' सुरक्षा पुरवण्याचीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. लसींच्या पुरवठ्यासाठी काही राजकारण्यांनी धमकी दिल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
मुंबईतील वकील दत्ता माने यांनी दाखल केलेल्या याचिकेतही लस पुरवण्याच्या संदर्भात पूनावाला यांना धमकावणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे, की लस उत्पादकांना असुरक्षित वाटत असल्यास लस उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. लस पुरवठा करण्यासाठी सतत दबावामुळे पुनावाला युनायटेड किंगडमला रवाना झाले आहेत.
याचिकेत म्हटले आहे, की पुनावाला यांचे आयुष्य व एसआयआयच्या मालमत्तांचे संरक्षण केले जाणे गरजेचे आहे कारण जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था कोविडच्या कोविशिल्ड नावाची लस तयार करणारी संस्था आहे.
याचिकाकर्त्यांच्या प्रमुख मागण्या -
१ - पुणे पोलीस आयुक्त व महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना याचिकाकर्त्यांनी म्हणजे दत्ता माने यांनी दिलेल्या तक्रारीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश.
२ - पुनावाला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 'झेड प्लस' सुरक्षा कवच प्रदान करा.