ETV Bharat / city

Mumbai Water Taxi : मुंबईत जल वाहतुकीचे नवे मार्ग सुरु होणार! - वॉटर टॅक्सी सेवा मुंबई

दोन महिन्यापूर्वी भाऊचा धक्का ते बेलापूर आणि बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा सुरु झाली आहे. बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेला पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र, भाऊचा धक्का ते बेलापूर दरम्यान चालणाऱ्या वॉटर टॅक्सीला मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

वॉटर टॅक्सी संग्रहित छायाचित्र
वॉटर टॅक्सी संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 28, 2022, 8:29 PM IST

मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी सेवेस प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबई पोस्ट ट्रस्टने प्रवाशांना या सेवेकडे आकर्षित करण्यासाठी भाऊचा धक्का व गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टी नंबर ५ वरून वॉटर टॅक्सीची सेवा चालविण्याची तात्पुरती परवानगी मुंबई पोस्ट ट्रस्टकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे

'या' कारणांमुळे घेतला निर्णय : दोन महिन्यापूर्वी भाऊचा धक्का ते बेलापूर आणि बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा सुरु झाली आहे. बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेला पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र, भाऊचा धक्का ते बेलापूर दरम्यान चालणाऱ्या वॉटर टॅक्सीला मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या मार्गावरील पर्यटक आणि प्रवासी वाढविण्यासाठी सागरी महामंडळ आणि मुंबई पोस्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु होते. त्यानंतर भाऊचा धक्का व गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टी नंबर ५ वरून वॉटर टॅक्सीची सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहेत.

वेळेची होणार बचत : मुंबई पोस्ट ट्रस्टचा एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेलापूर जेट्टीवरून निघाल्यावर डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलला पोहचल्यानंतर पुढील प्रवासासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी या सेवेला नापसंती दर्शवली. तब्बल आठवडाभर सेवा सुरु ठेवल्यानंतरही वॉटर टॅक्सी चालकांना या मार्गावर एकही प्रवासी मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाने रेवस व मोरा याठिकाणी जाणाऱ्या भाऊचा धक्का येथील जेट्टीवर वॉटर टॅक्सीला थांबा देण्यास तात्पुरती परवानगी दिली आहे. तसेच ज्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबई गाठायची आहे. त्यांसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या जेट्टी क्रमांक ५ वर थांबा देण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबईतून दक्षिण मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

बेस्ट बसेस आणि शेअर टॅक्सीचा सुविधा : महत्त्वाची बाब म्हणजे भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडिया येथे उतरल्यानंतर तत्काळ बेस्ट बसेस आणि शेअर टॅक्सीचा सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. याशिवाय वॉटर टॅक्सी चालविणाऱ्या कंपन्यांना गेट वे आणि भाऊचा धक्का येथे ओला-उबर टॅक्सी सेवेमार्फत कनेक्टिव्हिटी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहे. विशेष म्हणजे मुंबई पोस्ट ट्रस्टने दिलेल्या तात्पुरती परवानगीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथे अगोदरच सुरु असलेल्या खासगी हायस्पीड वॉटर टॅक्सी कंपनीला मोठा फटका बसणार असल्याचे बोलण्यात येत आहे.

हेही वाचा - BMC Work Going Slow Swing : 'प्रशासकांच्या कार्यकाळात पालिकेचे कामकाज संथ गतीने! 368 प्रस्ताव रखडले', आयुक्त म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.