मुंबई शिर्डीला जाणाऱ्या काकीनाडा एक्सप्रेसला Shirdi Kakinada Express coaches कायमस्वरूपी डब्यांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. मध्य रेल्वेने हा खास निर्णय नुकताच घेतला Central Railway decision for Shirdi rail आहे. इथून पुढे शिर्डीला जाणाऱ्या काकीनाडा एक्सप्रेसला Shiridi Kakinada Express news कायमस्वरूपी अधिकचे डबे असणार आहेत
गाडी क्रमांक 17208/17207 साईनगर शिर्डी - विजयवाडा एक्सप्रेसला साईनगर शिर्डी येथून दि. 14.09.2022 पासून आणि विजयवाडा येथून दि. 13.09.2022 पासून एक अतिरिक्त शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येईल. ट्रेन क्र. 17206/17205 साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेसला एक प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित कोच साईनगर शिर्डी येथून दि. 13.09.2022 पासून आणि काकीनाडा बंदर येथून दि. 12.09.2022 पासून जोडण्यात येईल. ट्रेन क्रमांक 17208/17207 साठी सुधारित संरचना एक प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी ( Shirdi railway for devotees ) आहे.
ट्रेन क्रमांक 17206/17205 साठी सुधारित संरचना आहे. दोन प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आहे. मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की, वरील गाड्यांमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या पीएनआरची स्थिती तपासावी.