ETV Bharat / city

छठपूजा उत्सव घरीच साजरा करावा, नदीकाठी जाण्यास राज्य सरकारची बंदी

गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, नुकतीच दिवाळीचा सण गेल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर छठपूजा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

anil deshmukh
अनिल देशमुख
author img

By

Published : Nov 19, 2020, 2:24 PM IST

मुंबई - कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा उत्तर भारतीयांनी छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्या सूचनांचे पालन करावे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना -

1. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने नागरिकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी. घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठपूजा साजरी करावी.

2. महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

3. छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतिषबाजी व ध्वनीक्षेपणास बंदी असेल.

4. उत्तर भारतीय नागरिकांनी छठपूजेदरम्यान मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी.

5. छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

6. कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील पालन करावे.

हेही वाचा - आले किती गेले किती, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरचंं - अनिल परब

कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती -

गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, नुकताच दिवाळीचा सण गेल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर छठपूजा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - "भाजपाला मुंबईवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचाय"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.