ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वसुलीसाठी मंत्रालयात आरएसएसचे लोक? - फडणवीस सरकारच्या काळात वसुलीसाठी संघाचे लोक

राज्यात फडणवीस सरकारच्या काळात विविध बदल्या करण्यासाठी संघाशी संबंधित व्यक्ती मंत्रालयात नेमल्याची चर्चा आहे, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करीत कॉंग्रेसने भाजपावर हल्ला चढवला आहे.

Fadnavis government
Fadnavis government
author img

By

Published : Oct 23, 2021, 5:26 PM IST

Updated : Oct 23, 2021, 5:35 PM IST

मुंबई - जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना संघाशी संबंधित एका व्यक्तीने अंबानी यांची फाईल मंजुरीसाठी ३०० कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाशी निगडीत तो व्यक्ती कोण आहे? असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. तर राज्यातही फडणवीस सरकारच्या काळात विविध मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त केलेले संघाचे लोक वसुली आणि फाईली क्लिअर करण्यासाठीच नेमले होते का? याची चौकशी सरकारने करावी, अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे
संघाने खुलासा करावा -

अन्य पक्षातील नेत्यांची बदनामी करणे ही संघ आणि भाजपची कार्यपद्धती असल्याचा आरोप लोढे यांनी केला. विरोधी पक्षांतील नेत्यांवर चिखलफेक करून आपला जातीय, धर्मांध आणि भ्रष्ट चेहरा लपवण्याचे काम संघ आणि भाजपाकडून सुरु असते, हे किरीट सोमैया प्रकरणातून संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराबाबत गळा फाडून ओरडणाऱ्या संघ आणि भाजपचा खरा चेहरा सत्यपाल मलिक यांनी जनतेसमोर आणला आहे. त्यामुळे ३०० कोटी रूपयांच्या लाचेचा प्रस्ताव देणारा तो संघाचा व्यक्ती कोण आहे? याचा खुलासा संघाने करावा, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

मंत्रालयात संघाशी संबंधित लोकांच्या नियुक्त्या ?

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना राज्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत लोकांच्या नियुक्त्या केल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. तर यापैकी अनेक जण बदल्या आणि फाईली क्लिअर करण्यात गुंतले होते, अशी चर्चा आहे. आता सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्याने या चर्चेला पुष्टी मिळाली असून महाविकास आघाडी सरकारने याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही लोंढे यांनी यावेळी केली.

हे ही वाचा -शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत शिजतंय काय?

Last Updated : Oct 23, 2021, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.