ETV Bharat / city

मदतीचा हात... 'दागिने विका, दागिने घरात राहून डबल होणार नाहीत', मुंंबईचा ऑक्सिजनमॅन - मोफत लसीकरण

आपल्या घरातील दागिने विका, दागिने घरात राहून डबल होणार नाहीत. बाहेर अनेक जण ऑक्सिजन सिलिंडरच्या शोधात आहेत. त्यांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. ऑक्सिजन अभावी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. घरातले दागिने विकून त्यातून येणाऱ्या पैशातून गरजूंना मदत करा. अशा सूचना पत्नीने दिल्यानंतर पस्कोल यांनी घरातले दागिने विकले आणि अनेक गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत दिले.

दागिने विकून पुरवले ऑक्सिजन सिलिंडर
दागिने विकून पुरवले ऑक्सिजन सिलिंडर
author img

By

Published : Apr 30, 2021, 4:10 PM IST

Updated : Apr 30, 2021, 4:40 PM IST

मुंबई - समाजामध्ये असे मोजकेच दानशूर लोक आहेत, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटतो. संपत्ती-दागिने यांचा मोह अनेकांना असतो, मात्र आपल्या जवळचे सर्व दागिने विकून गरजू रुग्णांना ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवण्याचे काम मालाड परिसरातील सलधाना कुटुंबाने केले आहे.

दागिने विकून पुरवले ऑक्सीजन सिलिंडर

पस्कोल सलधाना कुटुंब मुंबईच्या मालाड परिसरातील मालवणी या कुटुंबात चौघेजण राहतात. सलधाना यांच्या पत्नी रोझी या किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना डायलिसिस करावा लागतो. कोरोनाच्या काळात रुग्णांची होणारी वाताहत पाहता व्याकूळ झालेल्या सलधाना यांच्या पत्नीने पस्कोल यांना सांगितले की, आपल्या घरातील दागिने विका, दागिने घरात राहून डबल होणार नाहीत. बाहेर अनेक जण ऑक्सिजन सिलिंडरच्या शोधात आहेत. त्यांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. ऑक्सिजन अभावी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. घरातले दागिने विकून त्यातून येणाऱ्या पैशातून गरजूंना मदत करा. अशा सूचना पत्नीने दिल्यानंतर पस्कोल यांनी घरातले दागिने विकले आणि अनेक गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत दिले.

हे कार्य करून मला समाधान वाटते, माझे गेलेले दागिने माझी संपत्ती मला पुन्हा मिळेल, असा विश्वास पस्कोल यांनी व्यक्त केला आहे. मात्र हे सांगत असताना सरकारनेदेखील या सगळ्या रुग्णांची योग्य ती व्यवस्था करावी, त्यांना ऑक्सीजन सिलिंडर द्यावे औषधांचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा, असे देखील ते म्हणाले. अशा या कोविड योद्ध्याला ईटीव्हीचा सलाम.

हेही वाचा - मुंबईमध्ये तीन दिवस लसीकरण बंद, गर्दी मात्र कायम

Last Updated : Apr 30, 2021, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.