मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ( Swabhimani Shetkari Sanghatana ) वतीने संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी चक्क मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखे दिसणारे आणि डमी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेले पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील पांडुरंग शिंदे ( Dummy Chief Minister Pandurang Shinde ) यांना पंढरपूर येथे प्रतिकात्मक निवेदन देत मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका ( Harsh criticism of Chief Minister Shinde ) केली आहे. रणजित बागल ( Ranjit Bagal ) यांनी डमी मुख्यमंत्र्याना ( Dummy Eknath Shinde ) दिलेल्या निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्री हे सध्या राजकीय दौर्यामध्ये प्रचंड व्यस्थ आहेत. त्यामुळे त्यांना शेतकर्यांच्या प्रश्नांविषयी लक्ष देण्यास वेळ मिळत नसावा. मागील पंधरा दिवसांपासून फक्त गणपती आरत्या आणि आपल्या गटाचे आमदाराच्या स्नेहभोजन कार्यक्रमात व्यस्त आहेत. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे? असा सवाल करत बागल यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे डमी एकनाथ शिंदेंना स्वाभिमानीचे निवेदन देण्यात आले आहे.
म्हणून डमी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी - डमी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिकात्मकपणे लोकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी करत मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला आहे. राज्यात सध्या जनावरांवर आलेल्या लंपी स्कीन या संसर्ग जन्य रोगाची साथ आल्याने पशुधन धोक्यात आले आहे. अनेक त्यामुळे अनेक जिल्ह्यात जनावरांचे आठवडा बाजार, जनावरांच्या शर्यती, जनावरांची वाहतूक यावर बंदी आणली आहे. लंपि आजारावरील लस सशुल्क आकारली जाते .त्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आहे. तसेच राज्यभरात अनेक भागात अतिवृष्टी व काही भागात अवर्षण झाले. मात्र पिकविमा कंपनीने पर्जन्यमानात घोळ करून शेतकर्यांना पिकविम्यापासुन वंचित ठेवण्याचा डाव आखला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री गंभीर नाहीत. म्हणून डमी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्यावर तरी खरे मुख्यमंत्री शिंदे दखल घेतील अशी अपेक्षा यानिमित्ताने बागलांनी व्यक्त केली.
खासदार सुप्रिया सुळेंनी केली टिका - दरम्यान, नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवात काळात मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री पर्यंत अनेक मंडळांना व नेत्यांच्या घरी भेटी दिल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ( MP Supriya Sule ) जनतेच काम करण्यासाठी राज्याला दोन मुख्यमंत्री हवे, अशी टीका देखील केली होती. आता स्विभिमानीकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यपद्धतीचे खिल्ली उजडवण्यात आली आहे. या डमी मुख्यमंत्र्यांची सध्या पंढरपूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.