ETV Bharat / city

पार्थ पवार इमॅच्युअर.. त्याच्या विधानाला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

sharad pawar parth pawar
शरद पवार पार्थ पवार
author img

By

Published : Aug 12, 2020, 3:58 PM IST

Updated : Aug 12, 2020, 4:51 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेल्या विधानाला कवडीचीही किंमत नाही. त्यांच्या विधानाचा आणि पक्षाचा तसा कोणताही संबंध नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन संदर्भात पार्थ पवार यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट करून पत्र जारी केले होते. त्यावर मागील काही दिवसात वाद सुरू झाला होता. एकीकडे आजोबा शरद पवार यांचा कोरोनाकाळात सुरू असलेल्या राममंदिरासाठी विरोध दर्शवला होता, तर नातू पार्थ पवारांचा राम मंदिराला पत्र काढून पाठिंबा दर्शवला होता. त्यात पार्थ यांनी राममंदिर भूमीपूजन ऐतिहासिक दिन असल्याची भावना व्यक्त केली होती. तर जय श्री रामने पत्राची सुरुवात आणि शेवटी केला होता.

  • It is unfortunate that a person died by suicide, but why is it being discussed so much? I don't think it is such a big issue. A farmer told me that over 20 farmers have died by suicide, nobody spoke about it: NCP chief Sharad Pawar #SushantSinghRajputDeathCase https://t.co/LsHJ8gaQwr

    — ANI (@ANI) August 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - ठाकरे सरकारचा कोकणी माणसांवर कसला राग?

त्यात त्यांनी राम मंदिरासाठी खूप वेळ संघर्ष चालला आणि अखेर आता राम मंदिर उभारण्यात येईल. या ऐतिहासिक दिवसाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. तरुण पिढीने राम मंदिराचा संघर्ष पहिला आहे लोकशाही मध्ये अतिशय संयमाने प्रश्न सोडवला आहे. महत्त्वाचे या विजयामध्ये आपण नम्र राहिले पाहिजे. अयोध्यामध्ये असलेले रामाचे मंदिर आपल्याला आधुनिक भारतात सुद्धा रामराज्याची आठवण करून देईल, असे नमूद केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन पार्थ पवार यांनी टाकलेल्या या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते नाराज होते. परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे त्यावर कोणीही भाषण करत नव्हते. मात्र, आज पवारांनी याला वाचा फोडत पार्थ पवार यांच्या विधानाला कवडीची किंमत नाही त्यांचे ते वैयक्तिक विधान होते असा खुलासा करत यावर पडदा टाकला.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणात सुद्धा पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार यांच्या संदर्भात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. आता पवार यांच्यावर विधान केल्याने यावर विरोधकांकडून काय भूमिका जाहीर केली जाईल, हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा - बेळगाव शिवाजी महाराज पुतळा प्रकरण : ग्रामस्थांच्या 'या' निर्णयाने वादावर पडदा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी पार्थ पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी केली होती. शरद पवार आणि संजय राऊत यांची आज (बुधवार) भेट झाली.

'मुंबई पोलिसांना मी गेली ५० वर्षे ओळखतो, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणी काय आरोप केले, यात मी खोलात जाणार नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर नक्कीच दु:ख होत. पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते. सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मला याबद्दल विचारले. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटले. २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी त्याची नोंद घेतली जात नाही,' अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. एवढे करुनही ज्यांना सीबीआय चौकशी हवी असेल, तर माझा त्याला विरोध नाही, असेही वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

Last Updated : Aug 12, 2020, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.