मुंबई - नागपाडा येथील खाली केलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. मोरलेन रोडजवळील महफील हॉल येथे ही रिकामी केलेली इमारत होती. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती सायंकाळी 5.23 वाजता मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली.
हेही वाचा - नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे - पडळकर
अग्निशमन दल, पालिका कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
हेही वाचा - जगदंबा तलवार भारतात आणावी; शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने रास्तारोको