ETV Bharat / city

Param Bir Singh Suspension order: निलंबनाविरोधात परमबीर सिंग मुंबई उच्च न्यायालयात घेणार धाव - Former Commissioner of Police Param bir Singh

राज्य सरकारने काढलेल्या निलंबनाचा आदेश घेण्यास मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Param Bir Singh against suspend order ) यांनी नकार दिला आहे. राज्य सरकारने बेकायदेशीररित्या निलंबन केला असल्याचा दावा मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी ( Former Commissioner of Police Param bir Singh ) केला आहे. परमबीर सिंग यांना अँटिलिया प्रकरणानंतर 17 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात आले होते.

परमबीर सिंग
परमबीर सिंग
author img

By

Published : Dec 3, 2021, 3:55 PM IST

Updated : Dec 3, 2021, 4:08 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्य सरकारमधील कायदेशीर लढाई ( Param Bir Singh vs Maharashtra gov ) दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य सरकारने निलंबनाची कारवाई ( Param Bir Singh Suspension order ) केल्यानंतर परमबीर सिंग हे मुंबई मुंबई उच्च न्यायालयात ( challenge Suspension order in Mumbai High Court )धाव घेणार असल्याने सुत्रांनी माहिती दिली आहे.

राज्य सरकारने काढलेल्या निलंबनाचा आदेश घेण्यास मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Param Bir Singh against suspend order ) यांनी नकार दिला आहे. राज्य सरकारने बेकायदेशीररित्या निलंबन केला असल्याचा दावा मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केला आहे.

हेही वाचा-Param Bir Singh's Warrant Cancelled : परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

मुख्यमंत्र्यांनी निलंबनाची केली कारवाई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Former Commissioner of Police Param bir Singh ) यांचे 2 डिसेंबरला निलंबन ( Suspended ) करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंग यांच्या निलंबनाच्या फाइलवर सही केली होती. त्यानंतर आज अखेर त्यांना निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी स्वाक्षरी केल्यानंतर निलंबनाची फाइल पुढील प्रक्रियेसाठी राज्याच्या गृहविभागाकडे ( State Home Ministry ) पाठवली जाणार असून निलंबनाचा आदेश राज्याच्या गृह विभागाकडून केंद्रीय गृह विभागाकडे ( Central Home Ministry ) पाठवण्यात येणार आहे. परमबीर सिंग 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यामुळे हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परमबीर सिंग यांना अँटिलिया प्रकरणानंतर 17 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात आले होते.

हेही वाचा-Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याविरोधातला फरार आदेश न्यायालयाकडून रद्द

परमबीर सिंग यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल

परमबीर सिंग यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ठाणे, मुंबईमध्ये खंडणी, धमकी यांसारखे अनेक गुन्हे परमबीर सिंग यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर लावण्यात आलेले आहे.

हेही वाचा-Param Bir Singh : परमबीर सिंग यांचा अनिल देशमुखांवरील आरोपांपासून ते निलंबना पर्यंतचा घटनाक्रम, वाचा सविस्तर...

Last Updated : Dec 3, 2021, 4:08 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.