ETV Bharat / city

Param Bir Singh Summons : सीआयडीकडून परमबीर सिंग यांना समन्स - Mansukh Hiren Murder Case

मुंबई - CID कडून परमबीर सिंग यांना समन्स ( Param Bir Singh Summons ) देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाण्यातील दोन वेगवेगळ्या गुन्ह्याप्रकरणी सीआयडीचा समन्स त्यांना बजवण्यात आला आहे. सोमवारी आणि मंगळवारी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती आहे. श्यामसुंदर अग्रवालच्या तक्रारीवर सोमवारी चौकशी होणार आहे.

Param Bir Singh
परमबीर सिंग
author img

By

Published : Nov 27, 2021, 12:41 PM IST

Updated : Nov 27, 2021, 2:39 PM IST

मुंबई - CID कडून परमबीर सिंग यांना समन्स ( Param Bir Singh Summons by CID ) देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाण्यातील दोन वेगवेगळ्या गुन्ह्याप्रकरणी सीआयडीचा समन्स त्यांना बजवण्यात आला आहे. सोमवारी आणि मंगळवारी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती आहे. श्यामसुंदर अग्रवालच्या तक्रारीवर सोमवारी चौकशी होणार आहे.

मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात मुंबईमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा सीआयडी तपास करत आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना तपासासाठी सोमवारी बोलवल्याचा समन्स पाठवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात ( Kopari Police Station Thane ) दाखल खंडणी प्रकरणात परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल आहे या प्रकरणात देखील सीबीआय परमबीर सिंग यांना तपासासाठी मंगळवारी बोलवले असल्याचे माहिती मिळालेली आहे. ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या देखील तपास सीआयडी करत आहे.

काय आहे प्रकरण ?

100 कोटी वसूली प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किला कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केले ( Declared Absconding ) होते. तसेच आगामी 30 दिवसांच्या आत हजर न झाल्यास संपत्ती जप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीदेखील कोर्टाने दिली होती. त्यानंतर आता सिंह मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले होते.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर आरोप लावल्यानंतर तब्बल 231 दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणानंतर ते दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील ( Extortion Case ) गोरेगाव येथील प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी कांदिवली गुन्हे शाखेच्या ( Kandivali Crime Branch ) कार्यालयात गेले. त्यांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. चौकशीला परमबीर सिंग यांनी पूर्ण सहकार्य केले असल्याची प्रतिक्रिया देखील परमबीर सिंग यांच्या वकिलांनी दिली आहे.

काय आहेत सिंग यांच्यावर आरोप ?

अँटिलिया स्फोटके ( Antilia Blast Case ) आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर ( Mansukh Hiren Murder Case ) परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुटीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहत नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर तब्बल सात महिन्यानंतर ते रेंजमध्ये आले होते.

हेही वाचा - उस्मानाबाद : बनावट कागदपत्रे बनवून लाखोंचे बिले हडप; डॉक्टर फरार तर तक्रारदार टेक्निशियन जेरबंद

Last Updated : Nov 27, 2021, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.