नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूरमधील सीआयडी(CID) कार्यालयात परमबीर सिंगांची(Param Bir Singh) सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. खंडणी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान परमबीर सिंग यांच्यावर सीआयडीकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात सिंग यांची नवी मुंबईतील बेलापूर येथील कोकणभवन मध्ये सीआयडीच्या माध्यमातून सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे 5 तासांसाठी चौकशी करण्यात आली. सीआयडी चे पोलीस अधीक्षक एम एन जगताप आणि सीआयडी प्रमुख रतेश कुमार यांनी सिंग यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे.
कोकण भवनच्या मागच्या गेटने सोडले बाहेर
परमबीर सिंग कोकण भवन मधील सीआयडी कार्यालयात सोमवारी चौकशीसाठी आले होते. चौकशी झाल्यानंतर परमबीर सिंगांना कोकण भवनच्या मागील गेटने रात्री उशिरा बाहेर सोडण्यात आले. विशेषतः हा गेट कधीही उघडला जात नाही. तब्बल पाच तास चौकशीनंतर मीडियाला चुकवत दुसऱ्या गेटने दुसऱ्या गाडीत बसून परमबीर सिंग निघून गेले. माध्यमांना टाळण्यासाठी ते मुख्य मार्गातून न जाता दुसऱ्या मार्गाने निघून गेले. यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवून चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली होती.
Param Bir Singh : परमबीर सिंग यांची सीआयडीकडून सलग 5 तास चौकशी
नवी मुंबईतील बेलापूरमधील सीआयडी(CID) कार्यालयात परमबीर सिंगांची(Param Bir Singh) सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. खंडणी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान परमबीर सिंग यांच्यावर सीआयडीकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.