ETV Bharat / city

Pantry Cars Added : 'या' अकरा एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी पॅंट्री कार

रेल्वे प्रवाशांसाठी ( Railway passengers ) एक आनंदाची बातमी आहे. एलटीटी - गोरखपूर एक्सप्रेस (LTT - Gorakhpur Express),चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस, (Chennai Central Express) पुणे -दरभंगा एक्सप्रेस ( Pune-Darbhanga Express ), पुणे -एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस सारख्या अकरा मेल-एक्स्प्रेस गाडयांना मध्य रेल्वेने कायमस्वरूपी पॅन्ट्री डबा ( permanently pantry coaches ) जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पॅंट्री कार
Pantry cars
author img

By

Published : Dec 26, 2021, 1:42 PM IST

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने काही लांबपल्याचा गाड्यांमध्ये तयार जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा (Onboard Catering Services in Indian Railways ) पुन्हा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने लांब पल्या अकरा मेल- एक्स्प्रेस गाड्यामध्ये कायमस्वरुपी पॅन्ट्री बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून लांब पल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांना आपल्या जेवणाची सोय स्वःताच करावी लागत होती. कारण कोरोनाच्या झालेल्या उद्रेकामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रवाशांच्या जेवणाची मोठी गैरसोय होत होती.

प्रवाशांना मिळणार शिजवले जेवण -

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने लांब पल्याच्या गाडीच्या प्रवाशांना गाड्यांमध्ये तयार होणाऱ्या जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा बंद केली होती. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना स्वःताच जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून काेराेनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे रेल्वेने आपली वाहतूक पुर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच भारतीय रेल्वेने ( Decision of Indian Railways ) काही लांबपल्याचा गाड्यांमध्ये तयार जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेने सुद्धा ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न ( Central Railway offering food cooked in trains )देणयास सुरुवात केली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आता मध्य रेल्वेने आपल्या अकरा मेल- एक्स्प्रेस गाड्यामध्ये कायमस्वरुपी पॅन्ट्री बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना स्वःताच जेवणाची व्यवस्था करावी लागणार नाही.

या गाड्या बसविणार पॅन्ट्री कार -

ट्रेन क्रमांक 12165/12166 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस ( Lokmanya Tilak Terminus - Gorakhpur Express ), ट्रेन क्रमांक 22179/22180 लोकमान्य टिळक टर्मिनस – एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 11033/11034 पुणे - दरभंगा एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22131/22132 पुणे - बनारस एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22150/22149 पुणे - एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 11097/11098 पुणे - एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 11037/11038 पुणे - गोरखपूर एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 12107/12108 लोकमान्य टिळक टर्मिनस - लखनौ एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 12153/12154 लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 12161/12162 लोकमान्य टिळक टर्मिनस – आग्रा कॅंट लष्कर एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक 12173/12174 लोकमान्य टिळक टर्मिनस - प्रतापगड जंक्शन उद्योगनगरी एक्सप्रेस या अकरा मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी पॅन्ट्री डबा जोडला जाणार आहे.

हेही वाचा - Train Accidents Unidentified Bodies : रेल्वे अपघातांतील ४३४ मृतदेह बेवारस; वारसांचा शोध लावण्याचे पोलिसांचे प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.