ETV Bharat / city

जनतेच्या प्रेमामुळे भारावून गेलो - शरद पवार

शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शरद पवारांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. जनतेच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो असल्याची प्रतिक्रीया पवारांनी व्यक्त केली आहे. मी 55 वर्षांपासून राज्यात काम करत आहे. जनतेने मला ही संधी दिली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

NCP leader Sharad Pawar latest news
शरद पवार
author img

By

Published : Dec 12, 2020, 7:43 PM IST

मुंबई - शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शरद पवारांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. जनतेच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो असल्याची प्रतिक्रीया पवारांनी व्यक्त केली आहे. मी 55 वर्षांपासून राज्यात काम करत आहे. जनतेने मला ही संधी दिली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

जीवनाचं सुत्र स्वीकारलं आहे, त्या जीवनाच्या रस्त्यावर जाण्याचं प्रोत्साहन आपल्या मिळत असतं. सार्वजनिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाची काळजी घ्यावी लागते, त्यातून आपण शिकत जातो. ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्यांचं स्मरण करणं आवश्यक आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा निव्वळ उल्लेख करुन चालणार नाही, तर त्यांच्या विचारांचे आचारण आपण केले पाहिजे. असेही यावेळी शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपल्याला महात्मा फुलेंच्या मार्गावर चालायचे आहे

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी महात्मा फुले आणि पंचम जॉर्ज यांच्या बाबतची एक घटना सांगितली. पंचम जॉर्ज ज्यावेळी आले, त्यावेळी पोलीस पगडी बांधलेल्या इसमाला बाजुला करत होते. ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांना बाजुला करून पंजम जॉर्ज यांनी महात्मा फुले यांची भेट घेतली. त्यावेळी फुले यांच्या हातात शेतकर्‍यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे मागणी पत्र होते. शेतकऱ्यांना संकरीत बियाणांचे वाण, तसेच दुधासाठी संकरीत गाईंचा पुरवठा करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली होती. त्यावर इंग्रज सरकारने विचारही केला होता. म्हणजे आधुनिक विज्ञानाचा विचार महात्मा फुले यांनी त्यावेळी केला होता. तोच विचार पुढे शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. आणि आता आपल्यालाही त्याच मार्गावरून जायचे आहे असे पवारांनी म्हटले आहे.

वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणण्याची संकल्पना

कोरोनाकाळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम करण्याचे मी टाळत होतो. मात्र वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणण्याची संकल्पना जयंत पाटलांनी मांडली आणि मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. आजच्या कार्यक्रमांच्या नियोजनात तरुण पिढीचा पुढाकार होता, हे पाहून चांगले वाटले असेही यावेळी शरद पवार यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.