मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज बोललेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ( NCP Executive Committee Meeting ) खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार ( 105 MLAs Of BJP ) निवडून आले असले तरी त्यापैकी पन्नास आमदार राष्ट्रवादी ( Fifty MLAs From NCP ) काँग्रेस पक्षातून गेले असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला आहे. त्याशिवाय इतर अनेक विषयांवरही त्यांनी भाष्य केले आहे.
राज्यातील शेवटच्या तरुणांपर्यंत पोहोचायचे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष विस्तारावर अनेक चर्चा झाल्या. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यावर भाष्य केले. राज्यातील सत्ता गेल्यानंतर काय करायचे असेल त्यावेळेस शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांना विचारले त्यावेळेस पाऊस कमी झाल्यानंतर राज्यातील शेवटच्या तरुणांपर्यंत पोहोचायचे असा सल्ला पवार यांनी आपल्याला दिला असल्याचे या बैठकीतील सुप्रिया सुळे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सत्ता आणू शकते - राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात स्वबळावर सत्ता आणू शकते असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. मात्र पक्षामध्ये कोणतीही दुही असू नये अशी अपेक्षा त्यांनी न विसरता व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
केंद्राकडून सूड बुद्धीच राजकारण - नवाब मलिक यांनी आपल्या कामातून दिल्लीला देखील हलवले होते. म्हणूनच त्यांच्यावर केंद्र सरकारने सूड उगवला. अनिल देशमुख यांनाही अडकवण्यात आले. हा अन्याय असल्याचे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.