ETV Bharat / city

राज्यातील टास्क फोर्स कागदी घोडे नाचवायला आहे का? प्रवीण दरेकरांचा सवाल

रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच राज्यात आरोग्य व्यवस्था दयनीय झाली आहे. अनेक धक्कादायक गोष्टी घडत असताना राज्यातील कोरोना टास्क फोर्स काय करत आहे? टास्क फोर्स फक्त कागदी घोडे नाचवायला आहे का? असा सवाल विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
author img

By

Published : Apr 14, 2021, 8:40 PM IST

मुंबई - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. केवळ कोरोना रुग्णांची संख्याच नाही तर राज्यातील रुग्णालयांची स्थिती देखील भयंकर आहे. रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच राज्यात आरोग्य व्यवस्था दयनीय झाली आहे. अनेक धक्कादायक गोष्टी घडत असताना राज्यातील कोरोना टास्क फोर्स काय करत आहे? टास्क फोर्स फक्त कागदी घोडे नाचवायला आहे का? असा सवाल विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

श्री घाटकोपर वागड विशा ओसवाल समाज पुरस्कृत कोविड-१९ केंद्र उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज मंगळवारी दि. दरेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की कोरोना संकट काळात समाजाच्या बांधिलकीतून भाजपा कार्यकर्त्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेला मदतीचा हात देण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोग्य व्यवस्था सुधारण्यात भाजपचे सर्व कार्यकर्ते मदतीला हजर आहेत. आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा असून राज्यात बेड्स उपलब्ध नाहीत, रेमडेसीवीर व ऑक्सिजन साठा नसल्याचे दरेकर यांनी सांगून अनेक घटना समोर आणल्या. वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या 12 रुग्णाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी विक्रमगडला रुग्णालयात ६३ रुग्ण असताना ऑक्सिजनचा साठा नसल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर साठा उपलब्ध झाला. ठाणे येथे ऑक्सिजन अभावी २६ जणांना शिफ्ट करण्यात आले, अनेक रुग्णालयात बेड्सच्या कमतरतेमुळे रुग्णांना खुर्चीवरच ऑक्सिजन पुरवला जात असल्याचे भयंकर चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व घटना राज्याच्या दृष्टीने भयानक व दुर्दैवी आहेत. राज्यात सर्वत्र आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणे, आरोग्य व्यवस्था नीट करणे गरजेचे असताना सरकारला याबाबत चर्चा करायलाही वेळ नाही. त्यामुळे राजकीय टिकाटिप्पणी करण्यात वेळ न घालवता आरोग्य व्यवस्था मजबूत करावी, अशी भावना दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता कोरोना प्रतिबंधक लसींचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली असल्याचे दरेकर यांनी सांगितले. राज्यात आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा असून कोणत्या गोष्टीचा साठा लागेल त्याचे अगोदरच नियोजन होणे आवश्यक होते. परंतु आयत्या वेळेला विहीर खोदण्याचे काम राज्यसरकार व प्रशासन करत असल्याची टीका दरेकर यांनी केली. मृत्यूच्या नोंदीबाबत बोलताना दरेकर म्हणाले, की महापालिकेमध्ये ५७ मृत्यूची नोंद आहे तर स्मशानभूमीत ३०१ रुग्णांची नोंद आहे. यासाठी केवळ राज्यसरकार जिम्मेदार नसून प्रशासकीय यंत्रणासुद्धा बेफिकीर आहे. दमणला असताना सचिव सौरभ विजय याना दोन वेळा फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना दोन-तीन वेळा फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला पण त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्यास नकार देऊन त्या मालकांना आम्हाला संपर्क करण्यास सांगितले. त्यामुळे हे प्रशासन बेफिकर असून राज्यसरकारने बारकाईने लक्ष घालावे तसेच आरोग्य व्यवस्था वाढवावी व आवश्यक तेव्हढा खर्च करून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी विनंतीही दरेकर यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.