मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात दरेकर ( Pravin Darekar ) यांना न्यायालयाकडून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
आज याचिकेवर सुनावणी दरम्यान प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी युक्तिवाद करत असताना न्यायालयासमोर, मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा वर्ष 1997 मधला आहे. राज्य सरकारने केलेली कारवाई राजकीय सूड बुद्धीतून करण्यात आली आहे, असे सांगितले.
मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर (Case Registered Against Pravin Darekar) फॉर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. काल बुधवार (दि. 16 मार्च) रोजी दरेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावनी झाली, त्यावेळी ही याचिका फेटाळून लावत अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
अटक न करण्याची मागणी फेटाळली
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाने काल (Bombay High Court) दिलासा देण्यास नकार दिला. दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळण्याची मागणी केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात दरेकरांना अटक न करण्याची मागणी फेटाळली आहे. (Mumbai Bank Case Darekar) त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानुसार दरेकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली.
प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थेत मजूर म्हणून नोंदणी
प्रवीण दरेकर यांची ज्या 'प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थेत' मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे 'रंगारी' मजूर असल्याचे दिसते. भ्रष्टाचाराचा बराच रंग (चुना) त्यांनी गेले अनेक वर्षे मुंबई बँकेला लावला आहे. (Mata Ramabai Ambedkar Marg Police Thane) सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंद असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षात प्रवीण दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुरीची कामे केली व किती मजुरी यासाठी त्यांना मिळाली याचा लेखाजोखा मांडावा, अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे.
आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे
प्रवीण दरेकर बोगस मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केला होता. त्या आधारावर हा गुन्हा नोंद केला आहे.
हेही वाचा - Pravin Darekar : प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल; सुडभावनेने कारवाई केल्याची देरेकरांची प्रतिक्रिया