ETV Bharat / city

शेतकऱ्यांसाठी आता ऑनलाईन तारण कर्ज - सहकार मंत्री - शेतकरी कर्ज योजना माहिती

शेतकरी ठेवीदारांनी ऑनलाईन तारण कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेकडून अर्जाची छाननी केली जाईल आणि पात्र शेतकऱ्यास वखार पावतीवरील याच्या शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून शेतकऱ्याच्या बँक खाते आरटीजीएस अथवा एनएफटीद्वारे जमा केले जाईल.

Cooperation Minister Balasaheb Patil
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
author img

By

Published : May 28, 2020, 4:43 PM IST

मुंबई - लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ही नाविन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर 3 महिन्यांसाठी प्रथमता राबविण्यात येत आहे. यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते. सादर वखार पावती वखार अधिनियम, 1960 नुसार पराक्रम्य (Negotiable) असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते. वखार पावतीवर शेतकऱ्यास प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाईन पध्दतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करु शकतात तसेच शेतकऱ्यास यासंबंधीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन त्याच्या स्मार्ट फोनच्या आधारे मराठीमध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्मार्टफोनद्वारे शेतकऱ्यास आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पाठवता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ आणि पैसा वाचेल, असे पाटील म्हणाले.

शेतकरी ठेवीदारांनी ऑनलाईन तारण कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेकडून अर्जाची छाननी केली जाईल आणि पात्र शेतकऱ्यास वखार पावतीवरील याच्या शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून शेतकऱ्याच्या बँक खाते आरटीजीएस अथवा एनएफटीद्वारे जमा केले जाईल. शेतकऱ्यास ऑनलाईन कर्जाची सुविधा 1 ते 2 दिवसात उपलब्ध करून दिली जाईल. तारण कर्जाची व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा रुपये 5 लाख प्रति शेतकरी एवढी असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.