मुंबई- देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी जेएनपीटी बंदरामध्ये बॉयलरचा ( boiler blast in JNPT ) स्फोट झाला. या स्फोटात एका कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर आणि एक किरकोळ जखमी आहे.
ड्रीझिंगच्या कामातून झाला अपघात- जेएनपीटी बंदरामध्ये चॅनल रुंदीकरणाचे काम सुरू ( Channel widening work at JNPT port ) आहे. कामाचे ड्रेझिंग सुरू असताना या ड्रेझिंगसाठी वापरात येणाऱ्या बॉयलरचा स्फोट ( boiler dredging blast ) झाला. या स्फोटाच्या धक्क्याने येथे काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी अब्दुल स्लाम (२३) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हरीलाल प्रजापती हा कर्मचारी गंभीर भाजला आहे. त्याला ऐरोली, नवी मुंबई येथे बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात ( burn center New Mumbai ) आले आहे. यामध्ये अनुज राजवीर सिंग (२०) हा किरकोळ जखमी आहे. त्याच्यावर जेएनपीटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे.
सुरक्षेबाबत निष्काळजीपणा- बंदर विभागात हजारो कोटींची कामे सुरू असतात. तरीही सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा बाळगला गेला असल्याचे समोर आले आहे. देशातील महत्वाच्या बंदरामध्ये अशाप्रकारच्या घटना घडणे आणि यातून जीवितहानी होणे हे प्रकल्पाच्या दृष्टीने धोक्याचे म्हटले जात आहे. घडलेल्या स्फोटाने बंदर कामगारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा-Video : काटेपूर्णा अभयारण्याला वनोजाजवळ भीषण आग
हेही वाचा-Nagpur Factory Fire : नागपूरमध्ये कारखान्यात भीषण आग... ८ दुकाने जळून खाक.. कोट्यवधींचे नुकसान
हेही वाचा-VIDEO : येवल्यात संतप्त नागरिकांनी पेटवली मांस घेऊन जाणारी गाडी