ETV Bharat / city

राज्यात आणखी एका बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; मृतांचा आकडा 64 - corona infected police

महामारीच्या काळात कायद्या आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस कर्तव्य बजावत आहेत. मात्र, संक्रमणाचा विळखा राज्य पोलीस दलात वाढत असल्याचे चित्र आहे. काल पुन्हा एका कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या पोलिसांचा आकडा 64 वर गेला आहे.

corona in mumbai
काल पुन्हा एका कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
author img

By

Published : Jul 4, 2020, 1:04 PM IST

मुंबई - महामारीच्या काळात कायद्या आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस कर्तव्य बजावत आहेत. मात्र संक्रमणाचा विळखा राज्य पोलीस दलात वाढत असल्याचे चित्र आहे. काल पुन्हा एका कोरोनाग्रस्त पोलिसाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या पोलिसांचा आकडा 64 वर गेला आहे. मृत पोलिसांमध्ये 4 पोलीस अधिकारी व 60 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1 हजार 40 कोरोनाबधित पोलिसांवर उपचार सुरू असून यामध्ये 111 पोलीस अधिकारी तर 929 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 45 हजार 896 गुन्हे नोंदवण्यात आले. यामध्ये मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 784 जणांवर कारवाई करण्यात आलीय. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 292 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 861 जणांना अटक झाली आहे.

कोविड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 5 हजार 695 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या 1 हजार 335 प्रकरणात 29 हजार 607 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 88 हजार 306 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 9 कोटी 95 लाख 52 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 54 घटना घडल्या असून 86 पोलीस जखमी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.