मुंबई २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM narendra modi सतत महागाई नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरले असून त्यांची चुकीची धोरण आणि फसवणूक यामुळे जनतेच्या त्रासात आणखी भर पडली आहे, असे सांगत आता ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर Ramlila Maidan Delhi काँग्रेसने महागाई विरोधात Against Inflation हल्लाबोल आंदोलन करण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा Pawan Khera यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये Press conference ही माहिती दिली.
आठ वर्षात सिलेंडरच्या किंमतीत १५६ टक्के वाढ भारतातील महागाई inflation आणि बेरोजगारीला Unemployment मोदी सरकारची चुकीची आर्थिक धोरणे जबाबदार आहेत असे सांगत, आता ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेसने महागाई विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्याचे ठरवले आहे. एक काळ असा होता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी Pm narendra modi यांनी भारतातील जनतेला महागाई आणि बेरोजगारीमुक्त भविष्याचे स्वप्न दाखवले होते. याउलट, आज त्यांनी लोकांना ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारीच्या भीषण परिस्थितीत टाकले आहे, असा आरोपही खेरा यांनी केला आहे. गेल्या आठ वर्षातील मोदी सरकारचा रेकॉर्ड हे सत्य समोर आणतो असेही ते म्हणाले. आठ वर्षांपूर्वी एलपीजी LPG प्रति सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती, आता त्याची किंमत प्रति सिलेंडर १०५३ ते १२४० रुपये झाली असून त्यात १५६ टक्के वाढ झाली असल्याचे खेरा यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल Petrol व डिझेलच्या Diesel दरांच्या बाबतीतही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला पवन खेरा पुढे म्हणाले की, अन्नधान्य, दही, लस्सी आणि ताक या जीवनावश्यक वस्तू Necessary goods जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी २०१९ मध्ये मतदारांसमोर मान्य केले होते, परंतु २०२२ मध्ये त्यांनी याच वस्तूंवर जीएसटी GST लागू केला. २०१९ च्या निवडणुकीत जनतेची मते मिळविण्यासाठी त्यांनी उज्ज्वला योजनेसाठी खूप प्रचार केला, परंतु निवडणुकीनंतर लगेचच त्यांनी असंवेदनशीलता दाखवून स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी रद्द केली. एलपीजीचे दर दुपटीने वाढले आहेत. एलपीजी गॅस प्रति सिलिंडर किंमत १२४० रुपये झाल्याने करोडो ग्राहक आज त्यांचे रिकामे गॅस सिलिंडर पुन्हा भरण्याच्या स्थितीत नाहीत. पंतप्रधानांनी मत मिळवण्यासाठी भारतातील जनतेचा विश्वासघात केला आणि नंतर त्यांच्या बुडून मरा विचारसरणीनुसार त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असेही खेरा म्हणाले.
जनतेला आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि एलपीजीच्या किमती कमी होत आहेत, मात्र त्याचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. याउलट आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा जेव्हा भाव वाढतात तेव्हा पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किमती वाढवायला हे सरकार विसरत नाही. मोदी सरकारच्या दिशाहीन धोरणांमुळे बेरोजगारीची परिस्थिती भयावह वळणावर आली आहे. नोटाबंदी आणि घाईघाईने लागू करण्यात आलेल्या GST करप्रणालीने अर्थव्यवस्थेला आधीच मोठा फटका बसला आहे, या सगळ्यावर मोदी सरकार गप्प का आहे, असा प्रश्नही खेरा यांनी उपस्थित केला. या कठीण काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जनतेच्या पाठीशी उभी आहे. संसदेपासून रस्त्यापर्यंत आम्ही मोदी सरकारच्या नाकर्तेपणा आणि दिशाहीन धोरणांच्या विरोधात आवाज उठवला आहे ज्यामुळे भारतात महागाई आणि बेरोजगारीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. जून २०२१ पासून आत्तापर्यंत आम्ही सात देशव्यापी निषेध आणि जन जागरण कार्यक्रम आयोजित केले आहेत. ५ ऑगस्ट रोजी महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलन केल्यानंतर, येत्या रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी आम्ही दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाई विरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन केले असल्याचे सांगत जनतेने मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आव्हानही खेरा यांनी केल आहे.