मुंबई - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा बेपत्ता असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पथकाला 4 दिवसांपासून नुपूर शर्मा सापडल्या नाहीत, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिली ( Nupur Sharma Goes Missing Mumbai Police ) आहे.
मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रजा आकदमीच्या मुंबई विंगचे संयुक्त सचिव इरफान शेख यांनी नुपूर शर्माच्या विरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 29 मे रोजी धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक तेढ वाढवणे आदी आरोपांखाली त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
त्याच प्रकरणी मुंबई पोलिसांचे एक पथक नुपूर शर्मांना नोटीस बजावण्यासाठी गेले होते. पण, गेल्या चार दिवसांपासून त्या घरात नसल्याचे पोलीस त्यांना नोटीस देऊ शकले नाहीत. नुपूर शर्मा चार दिवसांपासून गायब आहेत. त्या घरी नाहीत, असा दावा पोलिसांनी केला आहे.
काय म्हणाल्या होत्या नुपूर शर्मा - भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं होतं. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात मोठे पडसाद उमटले होते.
हेही वाचा- Udayanraje Bhosale : 'तुमच्यात हिंमत असेल तर...'; उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान