ETV Bharat / city

ST Bus Accident Maharashtra : महाराष्ट्रात लालपरीचे आत्तापर्यंत झालेले दहा मोठे अपघात! - एसटी बस अपघात संख्या महाराष्ट्र

राज्यातील एसटी महामंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या बसेसच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांना अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. नादुरुस्त बसेस हा एक भाग असला तरी एसटी चालक याचे दुर्लक्ष आणि अन्य बाबी कारणीभूत असतात. महाराष्ट्रातील एसटी बसेसच्या ( ST Corporation Bus Accident ) अपघाताचे प्रमाण कमी असल्याचा दावा एसटी कामगार युनियनचे नेते श्रीरंग बर्गे यांनी दिली.

ST Bus Accident Maharashtra
ST Bus Accident Maharashtra
author img

By

Published : Jul 18, 2022, 4:29 PM IST

मुंबई - इंदूरहून अमळनेर येथे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धार येथे अपघात झाला. नर्मदा नदीत कोसळलेल्या बसमधील सुमारे 13 प्रवासी मृत्युमुखी पडले आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. एसटी महामंडळाच्या ( ST Corporation Bus Accident ) बसेसना अनेकदा अपघात होत असल्याची माहिती समोर येते. मात्र एसटी महामंडळाच्या बसेसच्या अपघाताचे प्रमाण हे अत्यल्प असल्याचा दावा एसटी संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांनी केला आहे. खासगी बसेसच्या अपघाताच्या तुलनेत एसटी बसेसना 0.17% इतके अपघात होतात, असे त्यांनी सांगितले आहे.

एसटी बसला झालेले दहा मोठे अपघात :

१) २० मे २०२२ रोजी चंद्रपूर - मुल महामार्गावर अजयपुर येथे एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. अक्कलकोट कलाप्पावाडी बस पलटी झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला.

२) 9 जून 2022 बीड जिल्ह्यातील लातूर अंबाजोगाई रोडवर ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात चार जण मृत्युमुखी पडले तर 15 जण जखमी झाले.

३) १९ ऑगस्ट २०१९ रोजी धुळे शिंदखेडा मार्गावरील एसटी बसला अपघात झाला. एसटी आणि ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर झाली. औरंगाबाद येथील शहादा येथे झालेल्या या अपघातात 15 प्रवासी मरण पावले तर वीस जण जखमी झाले.

४) 27 मे 2022 रोजी पालघर जिल्ह्यातील वाघोबा खिंड येथे एक एसटी बस दरीत कोसळली. या अपघातात 15 जण जखमी झाले.

५) 25 ऑक्टोबर 2021 रोजी सोलापूर पुणे महामार्गावर चिखली येथे एसटी बस आणि कंटेनर यांच्यात अपघात झाला. एसटी बस कंटेनरवर आढळल्याने आठ प्रवासी जखमी झाले.

६) नऊ जानेवारी 2022 रोजी लातूर औरंगाबाद महामार्गावरील बीड सायगाव येथे एसटी बसला अपघात झाला. एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले.

७) 20 जानेवारी 2020 रोजी नाशिक येथे एसटी बसला अपघात झाला. एसटी आणि रिक्षा यांच्या टक्कर झाल्याने एसटी जवळच्या विहिरीत कोसळली एसटीचा टायर फुटल्याने मेशी फाट्याजवळ झालेल्या या अपघातात 25 जण मृत्युमुखी तर 33 जण जखमी झाले होते.

८) पंधरा मे 2022 रोजी नगर शिर्डी मार्गावरील एसटी बसला मनमाड मार्गावर गुहा पाट नजीक अपघात झाला. एसटी बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाला होता.

९) 28 जून 2018 रोजी पनवेल अलिबाग मार्गावर एसटी बस आणि शिवशाही बसमध्ये भीषण अपघात झाला. कारले खिंड येथे झालेल्या या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले होते.

१०). 26 मे 2022 औरंगाबाद - जालना मार्गावर गाढे जळगाव शिवारात एसटी बस आणि बोलेरो पिक अप यांच्या अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार आणि तीन जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा - Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.