मुंबई - राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत ( Covid Patient Increased In Mumbai ) आहे. काल जवळपास तीन हजार सातशेच्या आसपास रुग्ण संख्या केवळ मुंबई सापडले आहेत. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांनी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाने दिलेले कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पालन ( Covid Guidelines In Maharashtra ) करावेत. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिल्यास मुंबईमध्ये लॉकडाऊन लावावा ( Lockdown In Maharashtra ) लागेल. मात्र, सध्या तरी मुंबईत लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती नसल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख ( Guardian Minister Aslam Shaikh ) यांनी दिली आहे.
सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची नजर
ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज होणाऱ्या सेलिब्रेशनवर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, मुंबई पोलीस तसेच सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत असून, मुंबईकरांनी प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईन्स पाळाव्यात असं आवाहन अस्लम शेख यांनी केल आहे.
..तर विदेशातून येणारे सात दिवस क्वारंटाईन
युरोपीयन देशांमध्ये ओमायक्रॉन ( Omicron In Europe ) तसेच कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक ( Foreign Traveler In Mumbai ) नागरिकावर बारीक लक्ष महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारचे आहे. त्यामुळे गरज पडल्यास विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या सोयीनुसार सात दिवस क्वारंटाईन करण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच मुंबईतील जम्बो कोविड ( Jumbo Covid Centre In Mumbai ) सेंटरदेखील पुन्हा सुरू करण्यात आली असल्याची माहिती शेख यांनी दिली.