ETV Bharat / city

आठवडाभरात मुंबईतील 'या' १३ विभागात कोरोनाचा प्रसार अधिक

मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यामधील ९७ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. यामुळे मुंबईत सध्या भीतीचे कारण नाही. तरीही रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिका काळजी घेत आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Mar 16, 2021, 7:42 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवडाभरात महापालिकेच्या २४ विभागापैकी १३ विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा दर सरासरी ०.४२ टक्के इतका आहे. महापालिकेच्या अंधेरी पश्चिम, मुलुंड, चेंबूर, बांद्रा, माटुंगा, मानखुर्द गोवंडी, गोरेगांव, कुर्ला, अंधेरी पूर्व, घाटकोपर, कांदिवली, भांडुप, खार या १३ विभागात सरासरी रुग्णवाढीच्या दरापेक्षा अधिक प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. रुग्ण दर वाढीचा सर्वाधिक दर हा के पश्चिम अंधेरी जोगेश्वरी या विभागात ०.६२ टक्के तर टी विभागात ०.५८ टक्के इतका आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण वाढ -

मुंबईत ७ ते १४ मार्च या आठवडाभरात रुग्णवाढीचा कालावधी सरासरी ०.४२ टक्के इतका आहे. त्यापैकी अंधेरी पश्चिम येथील के वेस्ट ०.६२ टक्के, मुलुंड टी विभागात ०.५८ टक्के, चेंबूर एम वेस्ट विभागात ०.५७ टक्के, बांद्रा एच वेस्ट विभागात ०.५३ टक्के, माटुंगा एफ नॉर्थ विभागात ०.५८ टक्के, मानखुर्द गोवंडी एम ईस्ट विभागात ०.५० टक्के, गोरेगांव पी साऊथ विभागात ०.४८ टक्के, कुर्ला एल विभागात ०.४५ टक्के, अंधेरी पूर्व के ईस्ट ०.४५ टक्के, घाटकोपर एन विभागात ०.४५ टक्के, कांदिवली आर साऊथ विभागात ०.४४ टक्के, भांडुप एस विभागात ०.४३ टक्के तर खार एच ईस्ट विभागात ०.४५ टक्के इतका रुग्ण वाढीचा दर आहे.

मुंबईमधील रुग्णसंख्या -

मुंबईत काल (दि.15 मार्च) रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 45 हजार 659 वर पोहोचला आहे. तर आजपर्यंत मुंबईत एकूण 11 हजार 535 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 लाख 18 हजार 642 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 582 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 165 दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 35 लाख 74 हजार 56 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

नागरिकांनी सहकार्य करावे -

मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यामधील ९७ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. यामुळे मुंबईत सध्या भीतीचे कारण नाही. तरीही रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिका काळजी घेत आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले आहे. रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती आणि चाळी सील केल्या जात आहेत. एखाद्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळून आल्यास तो विभाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला जाणार आहे. त्या विभागात अत्यावश्यक वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. रुग्णसंख्या वाढत राहिली तर अंशतः टाळेबंदी किंवा रात्रीच्या संचारबंदीचा विचार केला जाऊ शकतो. नागरिकांनी मुंबईमधील स्थिती सुधारण्यासाठी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.