ETV Bharat / city

लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत देणार सूचना - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९

प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. परंतु प्रवेश अद्यापही सुरु केलेले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत सूचना दिल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत देणार सूचना

author img

By

Published : May 14, 2021, 8:02 AM IST

मुंबई - कोरोनाच्या संसर्गामुळे जाहीर केलेल्या कडक निर्बंधामुळे शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया सध्या ठप्प आहे. या प्रवेश परीक्षेतंर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अद्यापही होऊ शकलेला नाही. तसेच आरटीई प्रवेशातील तांत्रिक कारणामुळे काही शाळांच्या प्रतीक्षा यादी मधील प्राधान्य क्रम बदलला गेला होता. तो दुरुस्त करण्यात आला असून, लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत सूचना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करु नये

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. मात्र प्रवेश अद्याप सुरु केलेले नाहीत. आरटीई प्रवेशातील तांत्रिक कारणामुळे काही शाळांच्या प्रतीक्षा यादी मधील प्राधान्य क्रम बदलला गेला होता. तो दुरुस्त करण्यात आला असून, प्रवेश मात्र सुरु झालेले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीई प्रवेशाबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. यामुळे प्रतिक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये. प्रवेश वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

लॉकडाऊननंतर देणार सूचना

पालकांना दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून एसएमएस केले जात आहेत. मात्र यानंतर प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळांतील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, वाढत्या कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. लॉकडाऊन संपताच अधिकृत सूचना देण्यात येणार आहेत.

हेही वाचा - जळगाव जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक रिकामा; २७५ रुग्णांना सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.