ETV Bharat / city

Warrant against Raj Thackeray : राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाचे वॉरंट; 8 जूनपर्यंत हजर राहण्याचे आदेश - राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Shirala Court warrant to Raj Thackeray) यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2008 मधील सांगलीतील एका प्रकरणाबाबत राज ठाकरे न्यायालयात हजर (Raj Thackeray in Shirala Court) राहत नसल्याने त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना 8 जूनपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Jun 6, 2022, 7:29 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Shirala Court warrant to Raj Thackeray) यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2008 मधील सांगलीतील एका प्रकरणाबाबत राज ठाकरे न्यायालयात हजर (Raj Thackeray in Shirala Court) राहत नसल्याने त्यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना 8 जूनपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिराळा न्यायालयाकडून आता हे वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहे. राज ठाकरे न्यायालयात हजर राहिल्यास त्यांचे वॉरंट रद्द करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी दिली आहे.

हेही वाचा - Raj Thackeray : एक घाव दोन तुकडे करणाऱ्या राज ठाकरेंचा मात्र पुन्हा यूटर्न?

काय आहे प्रकरण - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात एका जुन्या प्रकरणात सांगलीच्या शिराळा न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेमुळे कल्याणमध्ये २००८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये राज ठाकरेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. परंतु या अटकेनंतर महाराष्ट्रात मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. यामध्ये परळी आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सांगलीतील शिराळा न्यायालयाकडून राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जामीन मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी न्यायालयात हजेरी लावली नाही. सतत गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती - शिराळा न्यायालयाकडून राज ठाकरेंविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त झाले असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. तसेच याबाबत राज ठाकरेंना कळवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज ठाकरे वॉरंट रद्द करण्यासाठी स्वतः शिराळा न्यायालयात हजर राहू शकतात. अन्यथा मुंबई पोलीस या वॉरंटवरुन कारवाई करतील, असे संजय पांडे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंकडे आता दोन पर्याय असल्याचे पांडे म्हणाले. यामुळे राज ठाकरेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शिराळा न्यायालयात आरोपपत्र दाखल - राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदाराना भाग पाडले. बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Surgery : 'या' कारणामुळे होणार राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया; जाणून घ्या, डॉक्टरांचे मत...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.