मुंबई - अंधेरी पूर्व येथे दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे काम तसेच चकाला केबिन येथील झडप बदलण्यात येणार आहे. या कामामुळे दिनांक २ व ३ फेब्रुवारी दरम्यान अंधेरी व सांताक्रूझ
परिसरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा तर काही भागात पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. पालिकेच्या जल विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
जलवाहिन्या जोडण्याचे काम -
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘के/पूर्व’ विभाग येथील हॉटेल रिजन्सी जवळ, एन. एस. फडके मार्ग, अंधेरी पूर्व येथे १३५० मिलिमीटर व्यासाची बांद्रा आऊटलेट आणि १२०० मिलिमीटर व्यासाची पार्ले आऊटलेट या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे काम प्रस्तावित आहे. तसेच चकाला केबिन येथील १३५० मिलि मीटर व्यासाच्या जलवाहिनीवर असलेली ९०० मिलिमीटर व्यासाची झडप बदली करण्याचे काम मंगळवार, दिनांक २ फेब्रुवारीला सायंकाळी ६:३० वाजेपासून बुधवार ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.
पाण्याचा साठा करून ठेवा -
या कालावधीत मंगळवार, दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२१ रोजी सायंकाळी ६:३० वाजेपासून बुधवार, दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२१ रोजी सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत ‘के/पश्चिम’, ‘के/पूर्व’, ‘एच/पश्चिम’ व ‘एच/पूर्व’ विभागातील परिसरात काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे ‘के/पश्चिम’,‘के/पूर्व’ व ‘एच/पश्चिम’ विभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. तरी संबंधित नागरिकांनी या कालावधीत महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, व पुरेसे पाणी साठवून ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद, कमी दाबाने -
एच/पूर्व विभाग - पहाटे ०४:४५ ते सकाळी ०६:४५
मधु मनिषा (आगरीपाडा, गोळीबार,प्रभात वसाहत, वाकोला विभाग, डवरी नगर, कलिना, सी. एस. टी. मार्ग, कलिना डोंगर, सुंदरनगर, कलिना गांव,कोलीव्हरी गांव, जांभळीपाडा,शास्त्रीनगर) पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
एच/पश्चिम विभाग -
एल. आय. सी. (संपूर्ण सांताक्रूझ पश्चिम - सकाळी) पहाटे ०४:३० ते सकाळी ०९:००, खार पश्चिम - पहाटे ०४:३० ते सकाळी ०९:०० पाणीपुरवठा खंडित राहील.
वांद्रे पश्चिम - पहाटे ०४:३० ते सकाळी ०९:०० पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
के/पूर्व विभाग -
विले-पार्ले (पूर्व) (संपूर्ण विले-पार्ले पूर्व डोमेस्टिक एयरपोर्ट) सायंकाळी ०५:३० ते रात्री ०८:००, सहार मार्ग, एन. एस. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग सायंकाळी ०५:३० ते रात्री ०८:०० पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग रात्री ०८:०० ते १०:३० पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.
के/पश्चिम विभाग -
-जुहू–कोळीवाडा (मांगेलावाडी) सकाळी ०६:३० ते ०९:०० पाणीपुरवठा खंडित राहील
- एस. व्ही. मार्ग पहाटे ०३:३० ते सकाळी ०८:३० पाणीपुरवठा कमी दाबाने राहील
- गिलबर्ट हिल सकाळी ०८:३० ते सकाळी ११:१५ पाणीपुरवठा कमी दाबाने राहील
- जुहू – कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) सकाळी १०:०० ते दुपारी १२:१५ पाणीपुरवठा खंडित राहील
- चार बंगला दुपारी १२:१५ ते ०२:१० पाणीपुरवठा कमी दाबाने राहील
- विले-पार्ले पश्चिम दुपारी ०२:३० ते सायंकाळी ०४:५५ पाणीपुरवठा खंडित राहील