ETV Bharat / city

Andheri East By Election : उद्धव ठाकरेंकडून भाजपला अर्ज मागे घेण्याची विनंती नाही, मुरजी पटेल यांचा अर्ज मागे

author img

By

Published : Oct 17, 2022, 5:42 PM IST

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ( Andheri East By-Election ) अतिशय चुरशीची झालेली असताना भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP state president Chandrasekhar Bawankule ) यांनी केली आहे.

Andheri East By Election
Andheri East By Election

मुंबई - अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ( Andheri East By-Election ) अतिशय चुरशीची झालेली असताना भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP state president Chandrasekhar Bawankule ) यांनी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. परंतु भाजपने अर्ज मागे घ्यावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला कुठल्याही पद्धतीची विनंती, किंवा भेटगाठ न घेता भाजपने उमेदवार अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. अशातच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राने या सर्वांमध्ये मोठे ट्विस्ट निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

मुरजी पटेल यांचा अर्ज भरताना केलं होतं मोठं शक्ती प्रदर्शन - तीनच दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, खासदार मनोज कोटक हे नेते उपस्थित होते. याप्रसंगी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलताना, आशिष शेलार यांनी मुरजी पटेल हे २५ हजार च्या मताधिक्याने निवडून येतील असेही जाहीर केले होते. तसेच मागील दोन दिवसापासून ते अंधेरी पूर्व विभागात घरोघरी प्रचारात मग्न सुद्धा झाले होते, असे असताना अचानक काल राज ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील प्रथा परंपराची आठवण करून देत पत्र लिहिले व त्यानंतर घडामोडींना वेग आला. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली.

राज ठाकरे यांच्या पत्रानेच माघार, चर्चा रंगल्या? अंधेरी पूर्व, विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही पोट निवडणूक होत आहे. अशा परिस्थितीत जर दिवंगत आमदाराच्या घरातली व्यक्ती निवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे अशी परंपरा राज्यात राहिलेली आहे. परंतु याविषयी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी, ही परंपरा राहिलेली आहे, ,परंतु या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून किंवा नेत्यांकडून कोणीही आम्हाला या संदर्भामध्ये विचारणा केली नाही किंवा आमची भेटही घेतली नाही, असे सांगितले होते. पण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा करताना सुद्धा तशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली नव्हती. तरीसुद्धा भाजपने आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. मग काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रामुळेच हा अर्ज मागे घेतल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेची मोठी खेळी खेळण्यासाठी भाजपचे एक पाऊल मागे? उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सध्याच्या राजकीय वातावरणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा फायदा सुद्धा त्यांना भेटला असता, असे असताना त्यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात होता. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विजयाचा भाजपला नक्कीच फटका बसला असता. तसेच येणाऱ्या मुंबई महानगर निवडणुकीच्या तोंडावर हा पराभव त्यांना त्रासदायक ठरला असता आणि म्हणूनच या निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकंदरीत अभ्यास करून हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.