मुंबई - भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही, अशा शब्दांत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे. भाजपने महाविकास आघाडी सरकारचे मंत्री व नेत्यांना धमक्या दिल्या असून याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे.
हेही वाचा - प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्टपासून सुरू करावी - राज्य निवडणूक आयोग
भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. खोट्या केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा, पण याला आम्ही घाबरत नाही, असेही नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून याबाबत उत्तर दिले जाईल, अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. तसेच, भाजपकडून माजी गृह मंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
हेही वाचा - ४५ हजार भाडेकरूंना दिलासा, मालमत्ता कर वसुलीला स्थगिती