मुंबई - संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणातील ( Attack on Santosh Parab ) संशयित आरोपी, भाजप नेते नितेश राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांकडून अटक ( Nitesh Rane may be arrest by Police ) होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी ( Sindhudurg session court rejected Rane bail ) आज (3 जानेवारी) रोजी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
संतोष परब हल्ल्यामध्ये फरार असलेले नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांचे वकील देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा-Sindhudurg District Bank Result : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वर्चस्व कायम; 11 जागांवर फुलले कमळ
नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमुळे ( Sindhudurg DCC election controversy ) हल्ला केला असल्याची तक्रार संतोष परब यांनी सिंधुदुर्ग पोलीस स्थानकात दिली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी पावसाळी अधिवेशनातदेखील उमटले होते. त्यावेळी अधिवेशनादरम्यान नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी सभागृहात शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली होती. तेव्हापासून नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे हे फरार झाले आहेत. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जदेखील केला होता. या अर्जावर सत्र न्यायालयात दोन दिवस युक्तिवाद झाला. मात्र, तरीदेखील सत्र न्यायालयात नितेश राणे यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आले होते.
हेही वाचा-Narayan Rane Sindhudurg : जिल्हा बँक जिंकली, आता लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे - नारायण राणे
सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना
कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला ( Shivsena Vs Rane in Kokan ) मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत हा संघर्ष पाहायला मिळाला आहे. राणे विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीमध्ये रंगला होता. मात्र, या निवडणुकीत अखेर राणे यांना मोठे यश मिळाले आहे. 11 जागा राणे गटाच्या निवडून आल्या आहे. तसेच शिवसेनेच्या ताब्यात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा कोकणामध्ये नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.
गिरगावामध्ये नितेश राणेंविरोधात बॅनरबाजी
मुंबईत गिरगावात भाजप कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे राणे विरुद्ध शिवसेना (Shivsena Vs Rane ) असा वाद रंगला आहे. या बँनरवर नितेश राणे हे गायब असल्याचे ( Mla Nitesh Rane Missing Banner ) सांगण्यात आले आहे. त्यांना शोधून काढणाऱ्यास एक कोंबडी बक्षिस म्हणून दिले जाईल असे लिहीत राणे यांची माहितीही देण्यात आली आहे. नितेश राणे कोठे आहेत याचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत