ETV Bharat / city

परमबीर सिंग कुठे आहेत? आदित्य ठाकरेंना विचारा- नितेश राणे - Aditya Thackeray vs Nitesh Rane

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली. मात्र, त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अद्याप बेपत्ता आहेत. यावर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले, की परमबीर सिंग हे कुठे आहेत, हे सर्वात जास्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना माहित असेल. कारण परमबीर सिंग आयुक्त असताना आदित्य ठाकरे हे नेहमी सतत त्यांच्या कार्यालयात जात होते.

नितेश राणे
नितेश राणे
author img

By

Published : Nov 2, 2021, 5:24 PM IST

Updated : Nov 2, 2021, 6:54 PM IST

मुंबई - शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांबरोबर, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली. मात्र, त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अद्याप बेपत्ता आहेत. यावर बोलताना भाजपचे खासदार नितेश राणे म्हणाले, की परमबीर सिंग हे कुठे आहेत, हे सर्वात जास्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना माहित असेल. कारण परमबीर सिंग आयुक्त असताना आदित्य ठाकरे हे नेहमी सतत त्यांच्या कार्यालयात जात होते. वाटल्यास तिकडचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. त्यांचे परमबीर सिंग यांच्याशी चांगले संबंध होते. सुशांतसिंह राजपूत, दिशा सलियन यांच्या आत्महत्या प्रकरणी परमवीर सिंह त्यांना हवे होते. परंतु आता ते गायब झाले आहेत. त्यांचा ठावठिकाणा आदित्य ठाकरे यांना माहीत असेल. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी. तसेच परमबीर सिंग व सचिन वाझे हे आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते. परमबीर सिंग हजर झाले तर त्याचा त्रास ठाकरे कुटुंबियांना होणार आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले आहे.

परमबीर सिंग कुठे आहेत? आदित्य ठाकरेंना विचारा
हेही वाचा-विशेष : दिवाळीत गोड, तेलकट फराळ जीवावर बेतू शकतो; फराळ नियंत्रणात करा - आरोग्यतज्ञांचा सल्ला

हॉटेल फोर सीजन चर्चेत

हॉटेल फॉर सीजनमध्ये बऱ्याच अनैतिक गोष्टी होत होत्या, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, की त्यांच्याकडे काही सीसीटीव्ही फुटेज असेल तर त्यांनी जाहीर करावे. आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. त्या फोर सिझन हॉटेलमध्ये कोण यायचे ?कुठे बसायचे? त्या टेबलची किंमत किती असायची ही सर्व माहितीसुद्धा आम्हाला आहे. म्हणून नवाब मलिक यांनी पोपटपंची करण्यापेक्षा ड्रग्स प्रकरणांमध्ये नायजेरियन लोक मुंबई उपनगर उध्वस्त करत आहेत. नवाब मलिक यांनी पाकिस्तान व नायजेरियन लोकांचे एजंट बनू नये, असा टोला नितेश राणे यांनी लावला आहे.

हेही वाचा-महाविकास आघाडीला दुसरा धक्का, अजित पवारांशी निगडित मालमत्तावर जप्ती आणण्याचे आदेश

संजय राऊत यांनी संस्कृतीवर बोलू नये-

पुढे राणे म्हणाले, की संजय राऊत यांनी संस्कृती व संस्कार यावर बोलू नये. आमच्या घरात महिला नाही, तर काय भूत राहतात? आम्ही घरात नसताना आमच्या घरावर हल्ले झाले. तेव्हा कुठे गेले होते संजय राऊत ? असा टोलाही नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर लगावला आहे. खासदार संजय राऊत व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे जेवढे बोलतील तेवढी ते महाविकास आघाडी सरकारची कबर खोदत आहेत. त्यांचे बोलणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण उद्धव ठाकरे व शरद पवार यांना विनाशाकडे घेऊन जाणारे हे दोघच असणार आहेत, असा टोलाही खासदार नितेश राणे यांनी लगाविला आहे.

हेही वाचा-समीर वानखेडे ७० हजारांचे शर्ट आणि लाखो रुपये किंमतीची पँट वापरतात - नवाब मलिक

Last Updated : Nov 2, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.