मुंबई - कोरोनाकाळात मास्कला मागणी प्रचंड आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ते घालण्याचे आवाहन सातत्याने सरकारकडून केले जात आहे. मास्क आता दैनंदिन जीवनातला घटक बनला आहे. दोन दिवसांवर आलेले नवरात्री उत्सवाचे दिवस पाहता नऊ रंगांच्या ड्रेसला व साडीला मॅचिंग होणारे नऊ रंगांचे मास्कही मुंबईतील दादर बाजारात आले आहेत.
हेही वाचा - 'आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्र'; आशिष शेलारांची ठाकरे पिता-पुत्रावर टीका
विशेष म्हणजे या नऊ रंगी मास्कला अधिक मागणी आहे. राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. रोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनावरील लस येण्याआधी मास्क हाच कोरोनाचा प्रसार थांबवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मास्कची मागणी बाजारांमध्ये वाढली आहे. नवरात्र उत्सवातही नऊ दिवस नऊ रंगांना मॅचिंग होणारे वेगवेगळे मास्क आता मुंबईतील बाजारात आले आहेत.
हेही वाचा - सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, करुळ घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प