ETV Bharat / city

नवाब मलिक यांच्या जावयाची देवेंद्र फडणवीसांना मानहानीची नोटीस

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. फडणवीसांवर बदनामीकारक आणि खोटे आरोप करणे, मानसिक छळ, यातना आणि आर्थिक नुकसान म्हणून 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच आता आम्ही मागे हटणार नसल्याचे ट्विट मलिक यांची मुलगी निफोफर मलिक यांनी केले आहे.

समीर खान-फडणवीस
समीर खान-फडणवीस
author img

By

Published : Nov 11, 2021, 11:02 AM IST

Updated : Nov 11, 2021, 12:21 PM IST

मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांचे जावई समीर खान (sameer Khan) यांनी राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याविरोधात मानहानी केल्याचा दावा दाखल केला आहे. एनसीबी (अमली पदार्थ विरोधी पथक) ने समीर खान यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस यांनी समीर खान यांच्या घरी अंमली पदार्थ (गांजा) मिळाला असल्याचे प्रसारमाध्यमांवर सांगितले होते. याविरोधात समीर खान यांनी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याविरोधात पाच कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

मुलगी निलोफर मलिक
मुलगी निलोफर मलिक

समीर खान यांच्यावर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर त्यांना जामीन मंजूर झाला. तसेच कोर्टामध्ये सादर करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये (chargeshit) अमली पदार्थाचा उल्लेख नाही, असे समीर खान यांचे म्हणणे आहे. मात्र कोणतेही तथ्य लक्षात न घेता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असल्याचे दाव्यातून करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या दाव्याची माहिती समीर खान यांची पत्नी तसेच नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी ड्रग्ज प्रकरणात (drugs case) एनसीबीने (NCB) अटक केली होती. त्यानंतर नुकताच त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

  • False accusations ruin lives. Before one accuses or condemns they must know what they are talking about. This defamation notice is for the false claims & statements which Mr. @Dev_Fadnavis has put on my family. We will not back down. pic.twitter.com/xsQYcgDhMb

    — Nilofer Malik Khan (@nilofermk) November 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Nov 11, 2021, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.