ETV Bharat / city

अजित पवारांनीच केला शरद पवारांचा गेम - निलेश राणे

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेले भाजपाचे सरकार तीन दिवसात कोसळले होते. या सरकारवरून शिवसेना भाजपाला नेहमीच चिमटे काढत असते. पहाटेच्या शपथविधीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला. या टीकेनंतर निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेला उत्तर दिले आहे.

अजित पवार आणि शरद पवार
अजित पवार आणि शरद पवार
author img

By

Published : Sep 21, 2020, 4:56 PM IST

मुंबई - भाजपाने सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीला सोबत घेऊन पहाटेच शपथविधी घेतला होता. त्यांनतर पुरेसे संख्याबळ नसल्याने हे सरकार टिकू शकले नाही. मात्र, शिवसेना नेहमीच यावरून भाजपाला चिमटा काढत टीका करत असते. आज देखील शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपाला टोला लगावण्यात आला आहे. यावर शिवसेनेला उत्तर देत भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारांचा गेम अजित पवारांनीच केला असा टोला लगावला आहे.

  • शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला.

    — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांसह पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपाचेच सरकार बनले पाहिजे, असे मानणारे सहानुभूतीदार कोण? ते महत्त्वाचे' अशी टीका करण्यात आली आहे. तसेच 'राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला यावर देखील सामनामध्ये टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ विधिज्ञांची बैठक

प्रकरणी निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे, 'शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे-पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला'.

माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र व भाजपाचे नेते निलेश राणे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी आणि अशा प्रकारच्या ट्विटने चर्चेत असतात. त्यात राणेंनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली म्हटल्यावर वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - "पहाटेच्या मुख्यमंत्र्यांचे बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.