ETV Bharat / city

World Whistlers Champion : ओठाची हालचाल न करता कंठातून शिट्टी वाजवणारा अवलिया

शिट्टी तर सगळेच वाजवतात. मात्र कंठातून शिट्टी वाजवणाऱ्या ताडदेवच्या निखील राणेने सलग दोन वर्षे जपानमधील वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन ( World Whistlers Champion ) स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. याबद्दल ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट

World Whistlers Champion
World Whistlers Champion
author img

By

Published : Mar 30, 2022, 6:39 PM IST

Updated : Mar 31, 2022, 7:58 PM IST

मुंबई - समाजात शिट्टी मारणे हे वाईट तसेच असभ्य समजले जाते. शिट्टी मारताना ओठांने आवाज काढणे गरजेचे असते. मात्र, मुंबईतील ताडदेव भागात राहणारा निखील राणे मात्र, कंठातून शिट्टी मारतो. आहे ही नाही वेगळी कला. आणि याच कलेच्या जोरावर त्याने सलग दोन वर्षे जपानमधील वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन स्पर्धेत विजेतेपद मिळवत त्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तर कंठातून शिट्टी वाजवणाऱ्या या अवलियावर ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट...

कंठातून शिट्टी वाजवणारा अवलिया

अशी लागली शिट्टी मारण्याची सवय
ताडदेव येथील मध्यमवर्गीय कुटुंबात निखिल राणे राहतो. वयाच्या सातव्या वर्षी कंठातून शिट्टी वाजवण्याची त्याला सवय लागली. ओठांची हालचाल न करता, तो शिट्टी वाजवू लागला. कंठातून निघणाऱ्या आवाजाकडे सुरुवातीला त्याने बारकाईने पाहिले नाही. संगीताची आवड असल्यामुळे त्याने संगीत शिक्षण घेतले. संगीत शिक्षणाला शिट्टीच्या सुरांची साथ मिळाली. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कॉलेज शिक्षणाबरोबर अनेक ठिकाणी संगीताचे कार्यक्रम केले आहेत. दरम्यान, दर दोन वर्षांनी जपानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन स्पर्धेत त्याने प्रथम २०१६ मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत भारताला त्याने पहिल्यांदा आणि २०१८ मध्ये सलग दुसऱ्यांदा चॅम्पियनशिप मिळवून दिली. वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन स्पर्धेचे तीन प्रकार असतात. करावके प्रकार असतो. दुसरा वाद्य वाजवून शिट्टी वाजवायची असते. तिसरा शिट्टी वाजून नाचण्याचा प्रकार असतो. हिकी फुके या कॅटेगरी मध्ये निखिलला जेतेपद मिळाले आहे. या प्रकारात बँड वाजवून यात शिट्टी वाजवायची असते. सध्या निखील जपानमधील जागतिक शिट्टी स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. कोरोनामुळे निखिलची हॅटट्रीक चुकली. परंतु, यंदा होणाऱ्या स्पर्धेसाठी निखिलने जोरदार तयारी केली आहे.

हॅटट्रीक करणार
शिट्टी वाजवणे असभ्य, टपोरी वर्तन समजले जाते. परंतु, निखिल ज्या प्रकारे शिट्टी वाजवतो. ते पाहून लोक आश्चर्यचकीत होतात. तो नक्की शिट्टी वाजवतोय, की हसतोय असा प्रश्न पडतो. शिट्टी वाजवण्याचे प्रकार कधीच नामशेष होत नाही. त्याच शिट्टीने सलग दोन वर्षे जेतेपद मिळाले. शिवाय, या क्षेत्रात नाव कमावता आले आणि जगात नावलौकिक मिळाल्याचा सार्थ अभिमान असल्याचे निखिल सांगतो. कोरोनामुळे २०२० ला खंड पडला. यंदा २०२२ मध्ये स्पर्धो होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या स्पर्धेसाठी केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक पाठिंबा देखील जनतेने द्यायला हवा. जनतेकडून पाठिंबा दिल्यास इतिहास घडवता येईल असा विश्वास निखील व्यक्त करतो.

सकारात्मक दृष्टीकोनातून बघा
माझ्या यशामागे कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. शिट्टी वाजवण्याच्या स्पर्धेसाठी जपानमध्ये जात आहे, असे ज्यावेळी घरी सांगितले, त्यावेळी कसलाही विचार न करता, संमती मिळाली. कुटुंब नसते तर एकटा निर्णय घेऊ शकलो नसतो. परंतु, समाजात नकारात्मक मानसिकता भरलेली आहे. आजही त्यावर मात करत पुढे जातो आहे, अशी खंत निखिल व्यक्त करतो. समाजाने याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला हवे, असे ही निखिलने सांगितले.

भारतभर व्याप्ती वाढवायचीय
प्रत्येकामध्ये सुप्त कलागुण असतात. ते जगासमोर यायला हवेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्यातील कलागुण कलेच्या मुख्य प्रवाहात आणत नाहीत. तोपर्यंत लोक तुम्हाला ओळखत नाहीत. भारतात शिट्टी वाजवण्याचे कलेला देखील परफॉर्मिंग आर्टचा दर्जा मिळावा, यासाठी माझ्यासारख्या व्हिसलर्सचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकाराची व्याप्ती भारतभर वाढवायची आहे, असे निखिल सांगतो.
हेही वाचा - Health Check Ups of Drivers : अमरावतीत शासकीय वाहनांवरील चालकांची होते नियमित आरोग्य तपासणी; अपघाताचे प्रमाण नगण्य

Last Updated : Mar 31, 2022, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.