ETV Bharat / city

मनसेने केली नाईटलाईफची पोलखोल; कोरोनाकाळातही छमछम तेजीत - nayan kadam news

बोरिवलीमधील नाईट क्लबमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणाची सखोल कारवाई व्हावी अशी मागणी मनसे नेते नयन कदम यांनी केली आहे.

bar
बार सुरू
author img

By

Published : Mar 10, 2021, 3:32 PM IST

Updated : Mar 10, 2021, 4:22 PM IST

मुंबई - वरळी विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या पबमध्ये कोरोनासंदर्भात कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नाही, असा व्हिडिओ मनसेतर्फे प्रसारित करण्यात आला होता. यानंतर मोठा गोंधळ देखील झाला होता. असाच एक पोलखोल करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. बोरिवलीमधील नाईट क्लबमध्ये कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणाची सखोल कारवाई व्हावी अशी मागणी मनसे नेते नयन कदम यांनी केली आहे.

मनसे नेते नयन कदम

हेही वाचा - चार हजार द्या.. निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट घेऊन जा; मानखुर्दमधील लॅबचा प्रकार

कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही

लॉकडाऊनचे नियम आणि अटी पायदळी तुडवले जात असल्याने पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांना पत्र लिहले आहे. डान्सबार आणि हॉटेल्समध्ये नियमांपेक्षा अधिक गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमाचे पालन या ठिकाणी होताना दिसत नाही. बारबालांवर पैशांची उधळण सुरु असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ग्राहक, बारबाला आणि वेटर कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही. यासंबंधी कारवाई व्हावी यासाठी बोरिवली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र लिहिले आहे, असे कदम यांनी सांगितले आहे.

कोरोनामध्ये बार सुरू

लाखोंच्या नोटा उधळण

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वत्र रात्रीची संचारबंदी लागू आहे. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यासाठी सामान्य जनतेवर
कारवाईचा बडगा उगारत आहे, आणि कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ते योग्यही आहे. मास्क नसेल तर दंड आकारत आहेत. सोशल डिस्टनसिंगच्या नावाने लग्नात ५० च्या वर नातेवाईक नाही, शिवजयंती, मराठी भाषा दिवसही साधेपणाने साजरे करावे लागले, असे कडक निबंध फक्त सामान्य जनतेवरच लागू होत आहेत. पण मुंबईतील नाईट लाईफ मात्र जोरात सुरू आहे. कस्तुरबा पोलीस ठाणे हद्दीत महात्मा गांधी मार्ग आहे, दुर्दैवाने महात्मा गांधी मार्ग हा मुंबईत डान्स बारसाठी कुप्रसिद्ध आहे. सामान्य जनतेच्याननोकऱ्या गेल्या असताना हे डान्स बार मात्र जोरात सुरू आहेत. नोटांची उधळण येथे रोज दिसून येते. एका रात्रीत लाखोंच्या नोटा उधळल्या जातात असेही कदम यांनी सांगितले.

mns
कारवाई करण्याची मनसेची मागणी

हेही वाचा - ३६ वर्षांपूर्वी रवी शास्त्रींनी 'या' किताबासोबत जिंकली होती नवी कार!

बारवाल्यांकडून मारहाण

डान्सबारमध्ये बारबालाना नाचण्यावर बंदी असताना महात्मा गांधी मार्गावर रात्रीच्या नाच मैफिली सुरू असतात आणि त्यावर पैशांची उधळण होते. चारवॉक डान्स बार आणि क्लब ९ या बार मध्ये नोटांची उधळण, बारबालांचे नृत्य आणि अंग प्रदर्शन या बारमधून तुफान चालते. कोणी काही बोलायला गेल्यावर त्याला त्या बारवाल्यांकडून मारहाण केली जाते. मारहाण करणाऱ्यांवर कारवाहीही होत नाही, हे दुर्दैव, चारवाक डान्सबार आणि क्लब ९ डान्सबार पहाटे ४ वाजेपर्यंत चालू असतात तसेच रात्रभर ५० ते ६० बारबाला आणि १०० ते १५० ग्राहक बारमध्ये असतात.

mns
कारवाई करण्याची मनसेची मागणी

सामान्य जनता रस्त्यावर उतरून करेल आंदोलन

या डान्सबारच्या बाबतीत पोलीस प्रशासन गप्प का आहे? हा प्रश्न आहे. 'पोलीस आमचे काही करू शकत नाही, पोलिसांना मोठा हफ्ता, वर पर्यंत आम्ही देतो." हे जेव्हा बारवाल्यांकडून उत्तर मिळते तेव्हा या गोष्टीला दुजोरा मिळतो. रात्री ११ वजता बारमध्ये पोलीस जाऊन बंद केल्याची खात्री करतात, आणि बारचे शेटर (दरवाजे) बंद करून मागील दरवाज्यातून बारबाला आणि गिऱ्हाईक पुन्हा आत घेतले जातात आणि सकाळी ४ वाजेपर्यंत बारबालांचा नाच, पैशांची उधळण असा धुमाकुळ सुरू असतो. माझी आपणांस विनंती आहे की, या डान्सबारवर अंकुश लावून हा धुमाकूळ थांबवावा आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या मुजोर बारवाल्यांवर कडक कारवाई करावी. पॅनडेमिकमध्ये सामान्य जनता ११ च्या आत घरात आणि डान्सबार पहाटे ४ वाजेपर्यंत जोरात. असेच सुरू राहिले तर सामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा ही कदम यांनी दिला आहे.

हेही वाचा - संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

Last Updated : Mar 10, 2021, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.