मुंबई - बुली बाई ॲप प्रकरणात ( Bulli Bai App Case ) मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने ( Mumbai Cyber Police ) आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ( CP Hemant Nagrale ) यांनी काल दिली आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी वेगळे वळण लागले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नेपाळ कनेक्शन ( Bully Bai App Nepal Connection ) असल्याचे समोर आले आहे. मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करणाऱ्या एका ट्विटर युजरने ( Twitter user claims He Is Creator ) राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( State Home Minister Satej Patil ) यांच्या ट्विटला रिट्विट करत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर, अटक करण्यात आलेले आरोपी निर्दोष असल्याचे देखील या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
-
You have arrested the wrong person, slumbai police
— . (@giyu44) January 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I am the creator of #BulliBaiApp
Got nothing to do with the two innocents whom u arrested, release them asap mf https://t.co/QJA078wSnH pic.twitter.com/ycbDuc7cNS
">You have arrested the wrong person, slumbai police
— . (@giyu44) January 5, 2022
I am the creator of #BulliBaiApp
Got nothing to do with the two innocents whom u arrested, release them asap mf https://t.co/QJA078wSnH pic.twitter.com/ycbDuc7cNSYou have arrested the wrong person, slumbai police
— . (@giyu44) January 5, 2022
I am the creator of #BulliBaiApp
Got nothing to do with the two innocents whom u arrested, release them asap mf https://t.co/QJA078wSnH pic.twitter.com/ycbDuc7cNS
मुंबई पोलीस जाणार नेपाळला
मुंबई पोलीस सायबर सेलकडून बेंगलोरमधून विशाल कुमार झा ( Vishal Kumar Zha ) , तर उर्वरित दोन आरोपी श्वेता सिंग ( Accuse Shweta Singh ) , मयंक रावल ( Accuse Mayank Rawal ) उत्तराखंड मधून अटक केली आहे. उत्तराखंडमधील आरोपींना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्यांना मुंबईत घेऊन येणार आहे. तसेच आता नेपाळमधील मुख्य सूत्रधार याला देखील मुंबई पोलीस ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत. त्याकरता मुंबई पोलिस लवकरच नेपाळला रवाना होणार असल्याची अशी माहिती मुंबई पोलीस दलातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
आरोपींना आर्थिक मदत
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना या कामासाठी आर्थिक मदत दिली जात होती. दरम्यान @Giyu44 नावाच्या ट्विटरवरील खातेधारकाने ट्विट केले आहे की, तो बुली बाई ॲपचा निर्माता आहे. आणि ज्यांना यामध्ये अटक करण्यात आली आहे ते या प्रकरणात निर्दोष आहेत. त्यांचा काहीही संबंध नाही. मुंबई सायबर सेलने आरोपी झा याला अटक केल्यावर राज्याचे गृहमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी याबाबत ट्विट केले. बुधवारी पाटील यांचे ट्विट रिट्विट करत @Giyu44 यांनी स्वतःला बुली बाई ॲपचा निर्माता ( Bulli Bai App Creator ) म्हणून म्हटले आहे.
नेपाळी नागरिकांच्या सूचनेनुसार काम
आरोपी श्वेता सिंह ही नेपाळमधील एका सोशल मीडिया मित्राच्या सूचनेनुसार हे काम करत असल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सिंहकडून मिळालेल्या माहितीनुसार, गियू नावाचा नेपाळी नागरिक तिला बुली बाई ॲपबद्दल सूचना देत होता. @giyu44 याने ट्विटमध्ये पोलिसांना आरोपीला बुली बाई ॲपचा युनिक आयडी विचारण्यास सांगितले आहे. कारण हा युनिक आयडी केवळ बुली बाई ॲपच्या निर्मात्याकडेच आहे. तो युनिक आयडी अटक आरोपीकडे मिळणार नाही, असा देखील दावा या नेपाळी नागरिक असलेल्या तरुणाने केला आहे.