ETV Bharat / city

Gas Vehicles Rules : देशात प्रथमच केमिकल आणि गॅस वाहतूक वाहनांसाठी येणार नियमावली

देशात प्रथमच पहिल्यांदाच ( First Time In India ) महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलिसांनी केमिकल आणि गॅस वाहणाऱ्या वाहनांसाठी एक नवीन नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले ( Rules For Chemical And Gas Transport ) आहे.

author img

By

Published : Apr 13, 2022, 9:17 PM IST

Gas Vehicles
Gas Vehicles

मुंबई - सध्या जगावर केमिकल वॉरचे संकट आहे. त्यात आता देशात प्रथमच पहिल्यांदाच ( First Time In India ) महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलिसांनी केमिकल आणि गॅस वाहणाऱ्या वाहनांसाठी एक नवीन नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले ( Rules For Chemical And Gas Transport ) आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून केमिकल आणि गॅस टँकरच्या अपघातांमध्ये मोठी जीवितहानी टळली असली तरी राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. त्यामुळे भविष्यात कुठलीही जीवित किंवा वित्त हानी होवू नयेत. तसेच अपघातानंतर तात्काळ वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवी नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

गॅस टँकरची झाडाझडती - गेल्या दोन आठवड्यात लोणावळा औरंगाबाद आणि धुळे या ठिकाणी सलग गॅस आणि केमिकल वाहून नेणारे टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती. विशेष म्हणजे केमिकल आणि गॅस सारख्या टँकरचे वाढत जात असलेल्या अपघातामुळे महामार्गवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेतली असून, राज्यातील 20 हजार केमिकल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची 8 दिवसांत झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहेत. याशिवाय केमिकल व गॅसची माहिती असलेल्या तज्ञांच्या मदतीने लवकरच या वाहनांसाठी अपघातानंतर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची नवीन नियमावली तयार करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे.

'या' कारणांमुळे नियमावलीची गरज - वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी सांगितले की, लोणावळा येथे केमिकल टँकर उलटल्यानंतर पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक अंतर्गत मार्गाने वळविण्यात आली होती. हे केमिकल द्रव्यरूपातून स्थायू रूपात परावर्तित झाल्यानंतर ते रस्त्यावरून हटवताना प्रशासनाला मोठी अडचण निर्माण झालेली होती. याशिवाय मुंबई ते आग्रा महामार्गावर धुळे येथील टँकर अपघातात गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर टँकरमधील गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले होते. केमिकल आणि गॅस टँकरच्या वारंवार होणाऱ्या घटना कमी करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे 'ट्रेम कार्ड'? - महामार्गावर केमिकल आणि गॅस सारख्या ज्वलंत पदार्थांचे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना ट्रान्सपोर्ट इमर्जन्सी कार्ड (ट्रेम ) सोबत बाळगावे लागते. केमिकल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना 'ट्रेम कार्ड' ठेवणे बंधनकारक असते. त्यामुळे नेमक्या कोणत्या केमिकल किंवा गॅसची वाहतूक वाहनातून होत आहे, याची पुरेपूर माहिती कळते. तसेच, वाहनांचा अपघात झाल्यास संबंधित केमिकल किंवा गॅसवर नियंत्रण कसे मिळवायचे याचीही माहिती असते.

हेही वाचा - BMC Water For All Policy : मुंबई महापालिकेकडून 'अशी' राबवली जाणार 'वॉटर फॉर ऑल पॉलिसी'..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.