ETV Bharat / city

Omicron Patient in Dharavi : टांझानियामधून धारावीत आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह - High risk country

मुंबई - ओमायक्रॉन कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित प्रकारच्या विषाणू संसर्गाचा रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढलेली असताना धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आज त्याचा ओमायक्रॉन अहवाल हा पॉझिटिव्ह ( Omicron Patient in Dharavi ) आला आहे. त्यामुळे पुन्हा आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

New Omicron Patient in Dharavi
ओमायक्रॉन पॉझिटिव्ह
author img

By

Published : Dec 10, 2021, 5:35 PM IST

Updated : Dec 10, 2021, 8:03 PM IST

मुंबई - ओमायक्रॉन कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित प्रकारच्या विषाणू संसर्गाचा रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढलेली असताना धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या चाचण्यांचा अहवाल आला असून या प्रवाशाला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग ( Omicron Patient in Dharavi ) झाल्याचे समोर आल्याची माहिती पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. त्यामुळे पुन्हा आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या रुग्णावर पालिकेच्या सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • #UPDATE | The patient is asymptomatic and is not vaccinated; currently admitted at Seven Hills Hospital, Mumbai. Two people who had come to receive the patient have been traced as well: BMC

    — ANI (@ANI) December 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईतील धारावी परिसरात ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. ती व्यक्ती टांझानियाहून परतली होती, तिच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाने दिली आहे. रुग्णाला मोठ्या प्रमाणात लक्षणे नाही आहेत आणि लसीकरण केलेले नाही, रुग्णाला घेण्यासाठी आलेल्या दोन लोकांचाही शोध घेण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव -

राज्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवली येथे आढळला. त्यानंतर मुंबईमधील २ प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यातच धारावी येथे पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. या व्यक्तीवर सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले होते. या व्यक्तीचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून या प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल कस्तुरबा रुग्णालयाकडून देण्यात आला आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कातील २ जणांची चाचणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.

धारावी होती कोरोनाचा हॉटस्पॉट -

कोरोनाचा प्रसार सुरु झाला त्यावेळी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. आता धारावीत ओमायक्रॉन रुग्ण आढळून आल्यास पुन्हा धारावी हॉटस्पॉट बनण्याची शक्यता असल्याने धारावीकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धारावीमधील सर्व शौचालये सॅनिटाईझ केली जात असून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी केली जात असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.

हाय रिस्क देशातून आले 5392 प्रवासी -

10 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान हाय रिस्क ( High risk country ) देशातून 5392 प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 24 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात 20 पुरुष तर 4 महिला प्रवासी आहे. या पाॅझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व पॉझिटिव्ह प्रवासी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Pune Omicron Cases : पुणेकरांना मोठा दिलासा... 7 पैकी 5 ओमायक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह

Last Updated : Dec 10, 2021, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.