ETV Bharat / city

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महाविस्तार; महाराष्ट्रातील मंत्र्यांनी पदभार स्वीकारला

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा आज पदभार स्विकारला. नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम विभागाचा पदभार स्वीकारला. तर भारती पवारांनी आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतली.

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी पदभार स्वीकारला

author img

By

Published : Jul 8, 2021, 2:29 PM IST

Updated : Jul 8, 2021, 4:00 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला असून मोदींच्या 2.0 मंत्रिमंडळात 43 नव्या चेहऱ्यांचा संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, डॉ. भारती पाटील व कपिल पाटील यांना संधी मिळाली आहे. आज या नेत्यांनी पदभार स्वीकारला.

नारायण राणे यांनी केंद्रीय एमएसई मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. भारत पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून तर रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.

खासदार नारायण राणे -

नारायण राणे हे महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्द्यावर राजकारण तापलेल आहे. राज्यात 32 टक्के मराठा समाज आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार असताना राणे कमिटीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली होती. राज्यात युतीचे सरकार असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. नारायण राणेंना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. तसेच प्रशासनावर त्यांची पकड आहे. याचा फायदा केंद्रीय मंत्रिमंडळात मोदी सरकारला होईल. नारायण राणे हे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विरोधकांना थेट अंगावर घेण्याची धमक त्यांच्यात आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांचा मोठा उपयोग भारतीय जनता पक्षाला होईल. तसेच नारायण राणे हे कोकणातले मोठे नेते आहेत. कोकणामध्ये शिवसेनेची मोठी पकड आहे ही पकड सैल करण्यासाठी नारायण राणेचा वापर भाजपाला करता येणार आहे.

नारायण राणे यांनी स्वीकारला पदभार

हेही वाचा-मोदी मंत्रिमंडळ २.० : नवीन केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारला पदभार

खासदार कपिल पाटील -

खासदार कपिल पाटील हे आगरी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्रात ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे नेते म्हणून कपिल पाटील यांची ओळख आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरात मोठा औद्योगिक पट्टा आहे. या पट्ट्यात मोठं अर्थकारण लपलेल आहे. या सर्व भागांमध्ये आगरी समाजाचा मोठा प्रभाव असून सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आगरी समाजाकडून केली जातेय. आगरी समाजाच्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भविष्यकाळात भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली, ठाणे या भागात शिवसेनेचे मोठे वर्चस्व आहे. 15 ते 18 आमदारांचं राजकीय भविष्य ठरवू शकतील एवढी आगरी समाजाची मते या भागांमध्ये आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना दिलेल्या मंत्रिपदाचा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे.

हेही वाचा-पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या काय आहेत दर

रावसाहेब दानवे

केंद्रीय रेल्वे, खाणी मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे अन्नधान्य वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद होते.

New maharashtras ministers took charge today
रावसाहेब दानवे यांनी आज रेल्वे राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारला.

खासदार डॉ. भारती पवार -

दिंडोरी मतदार संघातून खासदार डॉ. भारती पवार नेतृत्व करतात. डॉक्टर भारती पवार या आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात. उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून भारती पवार यांच्याकडे पाहिले जात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक वर्ष त्यांच्या कामाचा अनुभव आहे. उत्तर महाराष्ट्रात त्यांचा दांडगा संपर्क आहे. डॉ भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे.

डॉ. भारती पवार यांनी स्वीकारला पदभार

भारती पवारांनी आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर रावसाहेब दानवे यांनी आज रेल्वे राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारला. नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम विभागाची सूत्र हाती घेतली आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांचीही वर्णी लागली.

Last Updated : Jul 8, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.