मुंबई - मुंबई ते पुणे दरम्यान दररोज धावणाऱ्या आणि चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या नव्या दख्खनच्या राणीला (डेक्कन क्वीन) अखेर मुहूर्त मिळालेला आहे. येत्या 22 जून 2022 पासून नव्या रंगात एलएचबी डब्यासह धावणार आहे. गेल्या एक महिन्यापासून चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून नव्या डेक्कन क्वीनचे 16 डबे मुंबईत दाखल झाले आहे.
डेक्कन क्वीनचे 16 डबे मुंबईत दाखल - भारतीय रेल्वेमध्ये प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक असा मान मुंबई ते पुणे डेक्कन क्वीन ट्रेनला आहे. या गाडीला चाकरमान्यांनी दख्खनची राणी म्हणून संबोधतात. 1 जुन 1930 पासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेस हे मुंबई ते पुणे दरम्यान धावत आहे. तेव्हापासून रेल्वेच्या पहिल्या सुपरफास्ट गाडीचे वैशिष्ट्ये असलेली डायनिंग कार (चाकावरचे उपहारगृह )आहे. आता डेक्कन क्वीनला निळ्या व पांढऱ्या रंगाऐवजी नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. या गाडीचे डब्बे एलएचबी एलएचबीचे स्वरूप देण्यात आल्यानेही गाडी नव्या साजात प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या महिन्यात चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधून नव्या डेक्कन क्वीनचे 16 डबे मुंबईत दाखल झाले होते. मात्र यागाडीला धावण्यास मुहूर्त मिळत नव्हता, याबाबद ईटीव्ही भारतने नुकतेच बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत मध्य रेल्वेने येत्या 22 जून 2022 पासून नव्या रंगात एलएचबी डब्यासह नवीन डेक्कन क्वीन एक्सप्रेस धावणार असल्याची माहिती दिलेली आहे याशिवाय याबाबत प्रसिद्धी पत्र सुद्धा काढलेले आहे.
नावलौकिकाला साजेसा रंग नाही- रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष हर्षा शहा यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, 1 जून 1930 मुंबई ते पुणे धावणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सुरू झाली. ही जगातील पहिली डायस्पीड डीलेक्स ट्रेन आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा पूर्वीपासून आगळावेगळा रंग होता. 14 नोव्हेंबर 1995 साली पुन्हा डेक्कन क्वीनचा रंग बदलण्यात आला होता. पूर्वीपासून इंजनपासून रंग कर वेगळा करण्याची मागणी करत राहिले. तेव्हा जाऊन आत्ताशी रेल्वेला जाग आली आणि तिला वेगळ्या रंगात दिला. डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा नावलौकिकाला साजेसा रंग नाही. प्रवाशांना दुर्भाग्याने नाईलाजास्तव स्वीकारावे लागत आहे.
नवीन डेक्कन क्वीन 16 डब्यांची- सध्याची डेक्कन क्वीन 16 डब्याची आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसही 24 डब्याची करण्याची मागणी आम्ही वारंवार रेल्वेला केली आहे. मात्र, रेल्वेकडून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. 22 जून 2022 पासून धावणाऱ्या नवीन डेक्कन क्वीन एक्सप्रेस 16 कोच आहे. ज्यामध्ये 1 डायनिंग कार, 1 विस्टाडोम कोच, 4 एसी चेअर कार, 8 सेकंड चेअर कार, 1 पावर कोच आणि 1 एसएलआर कोचा समावेश असल्याची माहिती हर्षा शहा यांनी दिली.