ETV Bharat / city

मलेशियात आढळला 10 पट वेगाने संसर्ग पसरवणारा कॊरोनाचा नवा अवतार - कोरोनाचे नवे म्युटेशन आढळले आहे

कोरोनाची दहशत सुरू असतानाच आता कोरोनाचा नवा अवतार अर्थात नवे म्युटेशन आढळले आहे. या म्युटेशनचे नाव डी-614 असे असून हा कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वात घातक म्युटेशन असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कारण कॊरोना विषाणूचे हे म्युटेशन आताच्या म्युटेशनपेक्षा थेट 10 पट वेगाने संसर्ग वाढवते.

-corona-found-in-malaysia-10-times-faster
कॊरोनाच्या नवा अवतार
author img

By

Published : Aug 17, 2020, 8:29 PM IST

Updated : Aug 17, 2020, 8:55 PM IST

मुंबई - कॊरोनाच्या नावाने आजही जगात दहशतीचे वातावरण असताना आता कोरोनाचा नवा अवतार अर्थात नवे म्युटेशन आढळले आहे. या म्युटेशनचे नाव डी-614 असे असून हा कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वात घातक म्युटेशन असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कारण कॊरोना विषाणूचे हे म्युटेशन आताच्या म्युटेशनपेक्षा थेट 10 पट वेगाने संसर्ग वाढवते.

मलेशियात हे म्युटेशन आढळले असून हा पसरला तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकताच मलेशियात कॊरोना विषाणूचे हे नवे रूप आढळले आहे. कॊरोना विषाणू चालाखपणे आपल्यात बदल करत आहे. त्यानुसार आता डी-614 हा नवा बदल मलेशियात पाहायला मिळाला आहे.

भारतातून मलेशियात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये कॊरोनाचे हे म्युटेशन आढळले आहे असेही त्यांनी सांगितले आहे. पण आता हे म्युटेशन खूपच कमी प्रमाणात असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. मात्र हा कॊरोना आताच्या कॊरोनापेक्षा 10 पट वेगाने संसर्ग पसरवत आल्याने त्याची भीती आहे, असेही डॉ. भोंडवे म्हणाले.

कॊरोनामुक्त झालेल्यांनाही भीती

डी - 614 कॊरोना पसरला तर तो नक्कीच घातक ठरेल. कारण कॊरोना रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढेल. आरोग्य यंत्रणेवर ताण येईल. पण त्याचवेळी हे कॊरोनाचे नवे रूप आल्याने आतापर्यंत ज्यांना कॊरोना होऊन गेला आहे, त्यांना ही याची लागण होण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

...तर लस बिनकामाची ठरेल

सध्या जगभरातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. पण अशात जर डी -614 कॊरोनाचा प्रसार वाढला तर हे सगळे प्रयत्न एका क्षणात वाया जातील. कारण या लशीचा काहीही उपयोग होणार नाही. आता जी लस तयार केली जात आहे, ती सद्या जगात संसर्ग पसरवत आहे. त्या कोरोनाच्या म्युटेशनला संपण्यासाठी आहे. पण डी -614 पसरल्यास लस यावर उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे आता या नव्या म्युटेशनला शक्य तितक्या लवकर रोखण्याचे मोठे आव्हान मलेशियासमोर उभे ठाकले आहे. तर सर्व देशानी आता अधिक काळजी घ्यायची गरज निर्माण झाली आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Last Updated : Aug 17, 2020, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.